जिल्हयात आजपासून एड्स जनजागृती सप्ताह

जिल्हयात आजपासून एड्स जनजागृती सप्ताह

नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी

एडस् दिनानिमित्त AIDS Day दि. 1 ते 7 डिसेंबरपर्यत महाराष्ट्र राज्य एड्स नियत्रण संस्था Maharashtra State AIDS Control Institute व नवनिर्माण समाज हितार्थ संस्थेच्या Navnirman Samaj Hitartha Sanstha पुढाकाराने एड्स जनजागृती सप्ताह AIDS Awareness Week साजरा करण्यात येणार आहे.

एड्स,एचआयव्हीबाबत समाजातील अनेक समज गैरसमज आहेत, ते दूर करून जनजागृतीचा संकल्प करीत जिल्हात यंदाही विविध उपक्रम कोविड नियमांचे पालन करून राबविण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य एड्स नियत्रण संस्था व नवनिर्माण सर्व समाज हितार्थ संस्था यांच्या याच्या समन्वयातून एड्सबाबत प्रबोधन करण्यात येणार आहे. सदर उपक्रम 1 ते 7 डिसेंबर दरम्यान जिल्हाभर राबविण्यात येणार आहेत.

1 डिसेंबर रोजी रोजी एचआयव्ही/एड्स क्षेत्रात अनेक वर्षांपासून काम करत असलेल्या कर्मचार्‍यांचा सत्कार, सामूहिक एडस विरोधी प्रतिज्ञावाचन एड्स जाणा, एड्स टाळा, यासारख्या घोषवाक्याद्वारे तसेच रांगोळीच्या माध्यमातून महाविद्यालय मध्ये जनजागृती, 2 डिसेंबर रोजी तालुका पातळीवर पोस्टर रांगोळी, पथनाट्याद्वारे जाणीव जागृती, 3 डिसेंबर रोजी शहादा येथे आरोग्य शिबीर, 4 डिसेंबर रोजी महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी एच आय व्ही एड्स जनजागृती, 5 डिसेंबर रोजी एचआयव्हीग्रस्त महिला पुरुषांना हेल्थ किट, सॅनिटायझर वाटप, 6 डिसेंबर रोजी जिल्हापातळीवर सांस्कृतिक कार्यक्रम, 7 डिसेंबर रोजी नंदुरबार येथे एचआयव्हीसह जीवन जगणार्‍या व्यक्तींसाठी शासनाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शक शिबिर व एड्स जनजागृती सप्ताह कार्यक्रमाचा समारोप करण्यात येणार आहे, अशी माहिती कार्यक्रम अधिकारी नितीन मंडलिक, नवनिर्माण संस्थेचे अध्यक्ष रवी गोसावी यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com