जिल्हा परिषदेत नाट्यमय घडामोडीनंतर सत्तांतराची दाट शक्यता

उपाध्यक्षपदी सुहास नाईक यांच्या निवडीची शक्यता, सुप्रिया गावित आणि सुहास नाईक एकाच वाहनात आले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी
सुप्रिया गावित आणि सुहास नाईक एकाच वाहनात आले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी
सुप्रिया गावित आणि सुहास नाईक एकाच वाहनात आले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी

नंदुरबार | प्रतिनिधी nandurbar

येथील जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) अध्यक्ष पदासाठी भाजपाकडून (bjp) डॉ.कुमुदिनी गावित, सुप्रिया गावित, राजश्री गावित यांनी तर काँग्रेसकडून सीमा वळवी, गीता पाडवी यांनी अर्ज खरेदी केले आहेत तर उपाध्यक्ष पदासाठी बाळासाहेबांची शिवसेनेकडून राम रघुवंशी, विजय पराडके यांनी उमेदवारी दाखल केली आहे. दरम्यान, भाजपकडून उपाध्यक्ष पदासाठी सुहास नाईक यांच्या अर्ज खरेदी करण्यात आला असल्याने जिल्हा परिषदेवर सत्तंतराची दाट शक्यता आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी आज दिनांक 17 ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेत सद्यस्थितीत काँग्रेसचे 24 भाजपाचे 20 राष्ट्रवादीचे चार बाळासाहेबांची शिवसेनेचे सहा तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दोन असे पक्षीय बलाबल आहे. मात्र राष्ट्रवादीचे चार सदस्य त्यांनी यापूर्वीचभाजपा समर्थन दिले आहे. मात्र, संख्याबळ जरी काँग्रेसकडे जास्त दिसत असले तरी गटबाजीमुळे तसेच फोडाफोडीच्या राजकारणामुळे जिल्हा परिषदेत सत्तांतर घडण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान आज अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी विहित मुदतीत भाजपाकडून अध्यक्षपदासाठी सौ.कुमुदिनी गावित, सुप्रिया गावित, राजश्री गावित यांनी तर काँग्रेसकडून सीमा वळवी व गीता पाडवी यांच्या नावाने अर्जांची खरेदी करण्यात आली आहे. उपाध्यक्ष पदासाठी बाळासाहेबांची शिवसेनेकडून राम रघुवंशी व विजयपराडके यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केले आहेत.

दरम्यान, काँग्रेस चे जि. प. सदस्य सुहास नाईक यांचा उपाध्यक्ष पदासाठीचा अर्ज भाजपाकडून खरेदी करण्यात आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. पद्माकर वळवी यांचे खंदे समर्थक असलेल्या नाईक यांच्या या अर्जमुळे जिल्हा परिषदेत सत्तांतराची दाट शक्यता आहे. त्यांच्यासोबत काँग्रेस चे सात सदस्य असल्याचे समजते . उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुप्रिया गावित आणि सुहास नाईक हे एकाच वाहनात आले होते. शिवाय उपाध्यक्ष पदासाठी भाजपाकडून सुहास नाईक यांचा एकमेव अर्ज असल्याने उपाध्यक्ष पदी त्यांची निवड निश्चित मानली जात आहे .

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com