
नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यात अवैध बायोडिझेल पंपावर (biodiesel pump) कारवाई (Action) केल्यानंतर त्यातून पळवाट (Loophole) कशी काढावी यासाठी लाखो रुपयांचा व्यवहार होवून खुद्द महसूल विभागाचेच(Revenue Department) अधिकारी, कर्मचारी मार्गदर्शन करतात, याबाबत महसूल कर्मचारी आणि पंप चालक यांच्यातील संवादाची कथीत ऑडीओ क्लिप (Audio clip) व्हायरल झाली आहे.
अवैध बायोडिझेल पंपचालकांचे स्थानिक महसूल यंत्रणेपासून मंत्रालयापयर्ंंत भ्रष्ट साखळी कार्यरत असल्याने लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे, असा आरोप करत संबंधीत महसूल अधिकार्यांवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बिपीन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान, जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात दररोज 5 हजार लिटर अवैध बायोडिझेलची विक्री होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
श्री.पाटील यांनी सांगितले, जिल्ह्यातील बायो डिझेलच्या विक्री संदर्भात व अवैध मार्गाने शासनाचा कुठलाही परवाना नसताना गेल्या दोन वर्षापासन विक्री सुरु आहे. याबाबत समाज माध्यमात अनेकवेळा आवाज उठविला. त्या अनुषंगाने जिल्हाधिकार्यांनी संबंधीतांविरुद्ध कारवाईचे आदेश दिले. परंतू या आदेशाचे जिल्हा पुरवठा शाखा तसेच अक्कलकुवा येथील तहसिलदारांनी अवैधमार्गाने संपत्ती जमा करण्याचा धडाका लावला आहे.
ज्या ठिकाणी छापा टाकला जातो, त्या ठिकाणी अवैध धंदे करणार्यांना आधी जिल्हा पुरवठा शाखेतून सुचना दिल्या जातात, की आज तुमच्याकडे छापा पडणार असून दक्ष रहा, त्या अनुषंगाने छापा पाडल्याचे दाखवून किरकोळ दोनशे ते पाचशे लिटर बायो डिटेल जप्त केले जाते. त्यानंतर अवैध धंदे करणार्यांकडून मोठा साठा इतरत्र हलविला जातो. या सर्व प्रकरणात महसुल यंत्रणेतील तहसिलदारांपासून जिल्हा पुरवठा शाखेतील अनेक लोक सहभागी होवून स्वतःचे उखळ पांढरे करुन घेत आहेत.
दि.3 जानेवारी 2022 रोजी अक्कलकुवा येथे कडवामहू फाट्यावर घडले असून अक्कलकुवा येथील तहसिलदारांनी चार दिवस उलटूनही ज्या ठिकाणी छापा टाकला होता, तेथे कुठलाही मुद्देमाल जप्त न करण्यासाठी संबंधित अवैधधंदेवाल्यांकडून लाखोच्या स्वरुपात आर्थिक व्यवहार करुन माल सोडून देण्यात आला आहे, असा आरोप त्यांनी केला. व्यवहार कसा झाला याची ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्या अनुषंगाने शासनास महसुल मिळवून देणार्या ज्या अधिकार्यांवर विश्वासाने जबाबदारी सोपविली जाते, तोच अधिकार्याने स्वतःच्या फायद्यासाठी शासनाची कशी फसवणूक केली आहे, त्यात जिल्हा पुरवठा कार्यालयातील काही कर्मचारी, स्थानिक अक्कलकुवा तहसिलदारांसह काही कर्मचारी कशी ही चेन चालवितात हे ऑडीओ क्लिपमध्ये सविस्तर आहे.
त्यामुळे शासनाचा महसुल वुडविण्यास जबाबदार असणार्या महसुल शाखेतील झारीतील शुक्राचार्यावर चौकशी समिती नेमण्यात यावी किंवा एसीबीद्वारे त्वरीत चौकशी करण्यात यावी, याबाबत त्वरीत चौकशी न झाल्यास संबंधित अधिकारी सर्व प्रकरणाची सारवासारव करून शासनाचा महसुल बुडविण्याची शक्यता नाकारता येत नाही. याप्रकरणी त्वरीत घेतल्यास संबंधित अधिकार्यांच्या चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अन्यथा प्रहार शेतकरी संघटनेतर्फे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा श्री.पाटील यांनी दिला आहे.
क्लिपमध्ये सांगण्यात येत असलेल्या पळवाटा
अक्कलकुवा तालुक्यात अवैध बायोडिझेल पंपवर कारवाई झाल्यानंतर पंपचालक व महसूल कर्मचारी यांच्यात मोबाईलवर झालेल्या संवादाची ऑडीओ क्लिप बिपीन पाटील यांनी पत्रकारांना ऐकवली. या ऑडीओ क्लिपमध्ये अवैध बायोडिझेलवर कारवाई झाल्यानंतर त्यातून बाहेर पडण्यासाठी महसूल कर्मचारीच पंपचालकाला पळवाटा सांगत आहे. यात कलम 188, 285 असे किरकोळ स्वरुपाचे कलम ज्याप्रमाणे पोलीस यंत्रणा लावते तसे कलम लावण्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय बायोडिझेलचे नमूने मुंबई येथील लॅबमध्ये गेल्यावर तेथील रिपोर्टमध्ये बायोडिझेल नसल्याचे सांगून इतर रसायन असल्याचा अहवाल देण्यासाठी 10 ते 12 हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगण्यात आले आहे. मात्र, या क्लिपमधील संवाद कोणत्या महसूल कर्मचार्याचा किंवा पंपचालकाचा आहे, याबाबत माहिती स्पष्ट होवू शकलेली नाही.