अखेर ‘ते’ वादग्रस्त अतिक्रमण जमिनदोस्त

पालिकेच्या कारवाईमुळे नवापुरातील अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ
अखेर ‘ते’ वादग्रस्त अतिक्रमण जमिनदोस्त

नवापूर Navapur । श.प्र.-

येथील नगर परिषद कार्यालय (City Council Office) आणि लोकनियुक्त नगराध्यक्षा हेमलता पाटील (Mayor Hemlata Patil) यांच्या निवासस्थानासमोरील वादग्रस्त अतिक्रमणावर (disputed encroachment) पालिकेने जेसीबी फिरवून जमिनदोस्त (razed to the ground.) केले. पालिकेने केलेल्या या कारवाईमुळे अतिक्रमणधारकांमध्ये (Excitement among encroachers) खळबळ उडाली आहे.

गणपती मंदिराच्या मागील बाजूस राहणार्‍या नागरिकांनी आपल्या घरासमोर व घराच्या मागील बाजूस अनधिकृत बांधकाम केले असल्याची बाब येथील रहिवासी दिपेश पाटील यांनी पालिकेच्या निदर्शनास आणून दिली होती.

दीपेश (बल्लू) पाटील यांनी राहत असलेल्या परिसरात अनधिकृत बांधकामामुळे आपत्तीच्या वेळेस या भागात अ‍ॅम्ब्युलन्स किंवा अग्निशमन बंबाला जाण्यासाठीदेखील जागा नसल्याने सदरचे अनधिकृत बांधकाम काढण्यासाठी नगर परिषदेकडे गेल्या अनेक दिवसांपासून पाठ पुरावा केला. नगर परिषदेकडून सहकार्य मिळत नसल्याचे बघून त्यांनी अनेक वेळा आंदोलन उपोषणही केले होते. त्यानंतर पालिकेकडून जागेची पाहणी करत अनधिकृत असलेले बांधकाम तोडण्यासाठी मोजणी करण्यात आली. लवकरच हे अतिक्रमण काढण्यात येईल असे आश्वासन उपोषणादरम्यान लेखी स्वरूपात देण्यात आले होते.

मात्र, आश्वासन देऊनही अतिक्रमण काढत नसल्याचे निदर्शनात आल्यानंतर दीपेश (बल्लू) पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी स्वप्नील मुदलवाडकर यांनी पोलीस बंदोबस्तात आज सकाळी 12 वाजेच्या सुमारास अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू केली.

मुख्याधिकार्‍यांनी अतिक्रमणावर करण्यात आलेल्या कारवाईने शहरात अतिक्रमण असलेल्या धनदांडग्याचे धाबे दणाणले आहे. यावेळी प्रशासकीय अधिकारी सतीष बागुल, न.पा बांधकाम अभियंता सचिन संदाशिव, अशोक साबळे, सचिन अग्रवाल, राहुल सिरसाठ आदी उपस्थित होते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अशोक मोकळ, पोहेकॉ गणेश बच्छे, विकी वाघ, प्रमोद पाठक, ज्योती पोटे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com