दोन वर्षांच्या खंडानंतर वनविभागातर्फे आज होणार...

तळोदा वन विभाग सज्ज, चार ठिकाणी उभारण्यात आले मचान, 13 कर्मचारी तैनात
दोन वर्षांच्या खंडानंतर वनविभागातर्फे आज होणार...

मोदलपाडा ।Modalpada। वार्ताहर

बुध्द पौर्णिमेला (Buddha full moon) होणार्‍या प्राणी गणणेच्या (Counting animals) पार्श्वभूमीवर तळोदा वन विभागाने (Taloda Forest Department) सुसज्ज तयारी केली असून यासाठी वाल्हेरी, बन,तुळाजा व अलवान अशा चार ठिकाणी मचान (Scaffolding) उभारण्यात आले आहेत.शिवाय 13 कर्मचारी देखील तेथे तैनात करण्यात आले आहे. कोरोना मुळे तब्बल दोन वर्षे प्राण्यांची गणना करणे बंद होते.या दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा वन विभागाकडून गणना करण्यात येणार आहे.साहजिकच वन्य प्रेमींना उत्सुकता लागली आहे.

दोन वर्षांच्या खंडानंतर वनविभागातर्फे आज होणार...
जिल्हा परिषदेच्या नूतन सीईओ भुवनेस्वरी एस यांनी तयार केली 28 विषयांची यादी... काय आहे यादी

बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण राज्यात वनक्षेत्रातील वन्य प्राण्यांची नेमकी किती संख्या आहे.हे जाणून घेण्यासाठी प्राणी गणना (Counting animals) केली जात असते.कारण बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आकाशात प्रचंड उजेड पडतो. त्याचा या शुभ्र प्रकाशात प्राण्यांचा पायाचे ठसे (Animal footprints) जमिनीवर स्पष्ठ उमटतात.

साहजिकच प्राणी,पक्षी यांची गणना अचूक करता येते.वरिष्ठ कार्यालयाचा आदेशा नुसार तळोदा वन विभागाने देखील आपल्या कार्यक्षेत्रातील वाल्हेरी,बन, तूळाजा, अल्वान या वनक्षेत्रातील प्राण्याची गणना करण्यासाठी सुसज्ज अशी तयारी केली आहे.यासाठी या चारही ठिकाणी कर्मचार्‍यांनी मचान (Scaffolding) देखील उभारण्यात आले आहेत.त्याचबरोबर 10 वनरक्षक,3 वणपाल असे 13 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

ही गणना 16 तारखेच्या मध्यरात्री पासून तर 17 च्या सकाळ पर्यंत करण्यात येणार आहे. मेवासी वन विभागाचे उप वनसंरक्षक लक्ष्मण पाटील यांनी प्राणी गणना व पक्षांची नोंद कशी करावी याबाबत अधिकारी व कर्मचार्‍यांना प्रशिक्षण (Training) देखील दिले आहे.

दोन वर्षाच्या खंडा नंतर प्रथमच या प्राणी,पक्षांची मोजणी होणार असल्याने वन्य जीव प्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.दरम्यान तळोदा वन क्षेत्रात बिबट,अस्वल, तरस,कोल्हे,रान पिंगळा,मोर अशा प्रजातीचे प्राणी,पक्षी आहेत.आता पर्यंत त्यांचा अधिवास देखील दिसून आला आहे.

दोन वर्षांच्या खंडानंतर वनविभागातर्फे आज होणार...
पाणी पुरवठ्यावरून अट्रावल ग्रामपंचायतीमध्ये राडा

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com