तळोदा येथे 25 वर्षांनंतर ‘त्यांनी’ दिला जुन्या आठवणींना उजाळा

तळोदा येथे 25 वर्षांनंतर  ‘त्यांनी’ दिला जुन्या आठवणींना उजाळा

मोदलपाडा Modalpada ता.तळोदा । वार्ताहर

अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवून जाती. या स्मृतीला उजाळा देण्यासाठी तळोदा (Taloda) येथील कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात (Junior College of Arts, Science and Commerce) शिक्षण घेणार्‍या माजी विद्यार्थीचा (Alumni) स्नेहमीलन सोहळा (Reunion ceremony) 25 वर्षांनंतर एकत्र येत मोठ्या उत्साहात व जुन्या आठवणींना उजाळा देत पार पडला.

सोशल मीडियाच्या आणि धकाधकीच्या जीवनात नाती दुरावली जात आहेत. परंतु नात्याचा आणि मित्रत्वाचा गोडवा आजही कायम टिकून आहे. असाच अनुभव तळोदा येथील 1997 व 1999 इयत्ता 10 वी 12 वी च्या माजी विद्यार्थी 25 वर्षानंतर एकत्र येत तळोदा येथील कनिष्ठ महाविद्यालयात स्नेहमीलन कार्यक्रम या माजी विद्यार्थ्यांनी घडवून आणला. यावेळी विविध बॅचेसचे सुमारे 60 पेक्षा अधिक माजी विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. सर्व विद्यार्थी आपल्या शालेय जीवनातील व कॉलेजमधील जुन्या आठवणींमध्ये रमले होते.यावेळी सर्वच जुन्या मित्रांच्या चेहर्‍यावर गप्पा गोष्टींची व तत्कालीन घालवलेल्या दिवसांच्या आठवणींनीची चमक झळकत होती.

या सर्व वर्गमित्रांनी संपूर्ण दिवस एकमेकांसोबत घालवला.प्रसंगी सुरुवातीला ज्या विदयालयात शिक्षण घेतले त्या ठिकाणी सर्व माजी विद्यार्थी एकत्र आले. नंतर तळोदा शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेले निसर्गरम्य ठिकाण कुंडलेश्वर येथे नियोजित कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात सर्वांच्या परिचयाने झाली यावेळी शिक्षक कैलास चौधरी व प्रा.सौ.संगीता पिंपरे यांच्या हस्ते गुलाब पुष्प व भेट वस्तू देऊन स्वागत करण्यात आले.स्नेह मिलन प्रसंगी मुंबई, नामपुर, नंदुरबार, धुळे, सुरत, येथील मित्रांनी हजेरी लावली होती.

शालेय जीवनातील गमती जमती गप्पा गोष्टी असे विविध अनुभव आपल्या वर्ग मित्रांना सांगितले. यावेळी सर्वांनी आपल्या अनुभवातून आजपर्यंतचा प्रवास उलगडून दाखवला.या सर्व वर्ग मित्रांमध्ये काही शिक्षक, व्यावसायिक,बांधकाम व्यावसायिक, प्रगतशील शेतकरी,लघु उद्योजक, काही मोठे उद्योजक झाले आहेत.

प्रसंगी योग अभ्यासक कैलास चौधरी यांनी योग अभ्यासाचे महत्त्व सांगितले. तसेच शिक्षक देवेंद्र शिंपी यांनी देखील मनोगत व्यक्त केले.अमोल चव्हाण यांनी सर्व मित्र मैत्रिणीच्या आगामी भेटीचे नियोजन सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास वाघ यांनी केले तर आभार दीपक सूर्यवंशी यांनी मानले. स्नेहमिलन कार्यक्रमानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील स्थानिक व सर्व मित्र-मैत्रिणींनी परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com