
सोमावल Somaval । वार्ताहर
शहरातील मुख्य बाजारपेठेच्या स्मारकाला (monument) जाहिरातींचा (advertising) विळखा (Viḷakha) पडला आहे. परंतु हा त्याकडे पालिका प्रशासनाकडून (Municipal administration) दुर्लक्ष करण्यात येत आहे. स्मारकाला मोकळा श्वास घेण्यासाठी ठोस कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
शहरातील पाच कंदील (Five lanterns) म्हणून प्रसिद्ध असलेल्या भागात स्वातंत्र्यानंतर स्मारक उभारण्यात आले. त्यानंतर स्वातंत्र्याच्या धगधगत्या स्मृती , आठवणी, प्रेरणा मिळविण्यासाठी स्मारकाची (monument) उभारणी करण्यात आली होती. परंतु आज एका शॉपीच्या जाहिरातीचे बॅनर (Advertising banner) स्मारकाच्या लोखंडी कुंपणावर लावण्यात आले आहेत. त्यामुळे स्मारक हे उत्तर दिशेकडून झाकले गेले आहे. आजपर्यंत मोठमोठ्या जाहिराती ह्या स्मारक चौकातील इमारतीवर, भिंतीवर व इमारतीच्या गॅलरीत लावण्यात आल्या आहेत. परंतु अशाप्रकारे स्मारकाला खेटून अगदी दोन फुटावर बॅनर लावण्याची बहुदा ही पहिलीच वेळ असेल. स्मारकाचा इतिहास, गौरव, गरीमा, प्रतिष्ठा व किर्ती यांची तमा न बाळगता स्मारकाच्या अगदी दोन फुटावर बॅनर बांधण्यात आले असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
व्यापार्यांना (merchants) आपल्या दुकानाची जाहिरात करतांना स्वातंत्र्य स्मारकाचा विसर पडला आहे. परिणामतः स्मारकाचा वापर सर्रास वापर जाहिरातीसाठी केला जात आहे. पालिकेचे मुख्याधिकारी, सक्षम प्रशासकीय अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी व पोलीस अधिकारी याच रस्त्याचा वापर करतात, परंतु त्यांना स्मारकाला लावलेले दिसत नाही का? का या अधिकार्यांकडून मुद्दाम त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते? असे प्रश्न जनसामान्यांना पडत आहेत . यावर योग्य ती कडक कार्यवाही केली असता अश्या घटनांचा कायमचा पायबंद करणे शक्य होईल.