नंदुरबार नगरपालीकेच्या नूतन इमारतीत कामकाजाला सुरुवात

नंदुरबार नगरपालीकेच्या नूतन इमारतीत कामकाजाला सुरुवात

नंदुरबार - प्रतिनिधी nandurbar

नगराध्यक्ष सौ.रत्ना रघुवंशी (Mayor Mrs.Ratna Raghuvanshi), उपनगराध्यक्ष कुणाल वसावे व सभापतींनी नगरपरिषदेचा नूतन वास्तुत सोमवार पासून कामकाजाला सुरुवात केली. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला.

नंदुरबार नगरपालिकेच्या (Municipality) नूतन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.पालिकेच्या वैभवासाठी रविवारी सर्व धर्मीय प्रार्थना सभा झाल्यानंतरच सोमवारी नगराध्यक्ष सौ रत्ना रघुवंशी, उपनगराध्यक्ष कुणाल वसावे व सभापतींनी नगरपरिषदेचा नूतन वास्तुत सोमवार पासून कामकाजाला सुरुवात केली.यावेळी बाळासाहेबांची शिवसेना नेते,माजी आ.चंद्रकांत रघुवंशी व मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी पदाधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

यावेळी जि.प सदस्य ॲड.राम रघुवंशी, उद्योजक मनोज रघुवंशी, पाणी पुरवठा सभापती कैलास पाटील, शिक्षण सभपाती राकेश हासानी नगरसेवक परवेज खान,नगरसेवक रविंद्र पवार, गजेंद्र शिंपी, नगरसेविका जागृती सोनार, भारती राजपूत, मनिषा वळवी, चेतन वळवी,फारुख मेमन, प्रमोद शेवाळे, जगन्नाथ माळी,फरीद मिस्तरी,मोहितसिंग राजपूत, रियाज कुरेशी,अतुल पाटील तसेच पालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com