सारंगखेडयाच्या ऐतिहासिक यात्रेला गड-किल्ल्यांच्या प्रवेशद्वाराची जोड

सारंगखेडयाच्या ऐतिहासिक यात्रेला गड-किल्ल्यांच्या प्रवेशद्वाराची जोड

सारंगखेडा | वार्ताहर- SARANGKHEDA

चार शतकांहून अधिक काळाची परंपरा असलेल्या श्रीदत्त यात्रोत्सवानिमित्त होणार्‍या चेतक फेस्टिव्हलमध्ये (Chetak Festival) येणार्‍यांचे स्वागत ऐतिहासिक पध्दतीच्या गड-किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या प्रतिकृतीनी करण्यात येत आहे. अश्व स्पर्धेसाठी येणार्‍या अश्वांची सोयदेखील राजेशाही पध्दतीने करण्यात येणार आहे.

येथे महानूभाव पंथियांचे महत्वाचे ठिकाण असलेल्या एकमुखी श्री. दत्त यात्रेला ८ डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. यानिमित्त येथे अश्व बाजार भरतो. चेतक फेस्टिव्हलच्या माध्यमातून यात्रेची व्याप्ती वाढवण्यात येत आहे.

त्यामुळे यात्रेत अधिकाधिक सोयी आणि नाविन्य आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. चेतक फेस्टिव्हल पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक येतात. त्यामुळे दरवर्षी ऐतिहासिक गड, किल्ल्याच्या प्रतिकात्मक प्रवेशद्वाराचे तटबंदीचे देखावे उभारण्यात आले आहेत.

या देखाव्याने चेतक फेस्टिव्हलचे प्रवेशद्वार तयार करण्यात आले आहे. तसेच याच मैदानावर अश्व स्पर्धा रंगणार असल्याने देशातील अनेक राज्यातून अप्रतिम सौदर्य, निपूण घोडे येथे दाखल होत आहेत. त्यांना राजेशाही थाटात सोयी करण्यात आल्या आहेत.

किल्ला, गड. अश्व असे समिकरण आहे. राजा महाराजांच्या काळात घोड्यांची सवारी असायची. छत्रपती शिवाजी महाराजांनी घोडयाचा मदतीने अनेक गड. किल्ले जिंकले. त्या पार्श्वभूमीवर येथील चेतक फेस्टिव्हलतर्फे (Chetak Festival) अश्व नगरीत जाण्यासाठी यंदा राजस्थानमधील जोधपूरचा उम्मेद भवन पॅलेसचा देखावा तयार केला आहे.

उम्मेद पॅलेस हा देशातील सर्वात महाग व सुंदर महलापैकी आहे. महाराजा उम्मेदसिंह यांचा महल होता. या देखाव्याच्या प्रवेशद्वाराने अश्व व पर्यटकांनी जाण्यासाठी मार्ग तयार केला आहे. अश्व उभे करण्यासाठी राजेशाही पध्दतीने राहुट्या तयार केल्या आहेत. पर्यटक, यात्रेकरू, अश्वखरेदीदार यांना राहण्यासाठी विश्रांतीसाठी तंबूची व्यवस्था केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com