अडीच हजाराची लाच स्विकारणार्‍या जि.प.च्या कनिष्ठ सहाय्यकास अटक

नंदुरबार येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
अडीच हजाराची लाच स्विकारणार्‍या जि.प.च्या कनिष्ठ सहाय्यकास अटक

नंदुरबार | प्रतिनिधी - nandurbar

जिल्हा परीषदेच्या लघु सिंचन विभागामार्फत केलेल्या कामाची १० टक्के सुरक्षा अनामत रक्कम परत मिळविण्यासाठी अडीच हजार रुपयांची लाच स्विकारणार्‍या कनिष्ठ सहाय्यक गुप्तेश चंद्रकांत सुगंधी याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे.

यातील मुळ तक्रारदाराचा मोठा भाऊ विशाल यांना जिल्हा परीषदेच्या लघु सिचन विभाग येथुन सन २०१८-१८ मध्ये जिल्हयात विविध ठिकाणी लघुबंधारे बांधकामाचे काम मिळालेले होते.

तक्रारदारांचा सिव्हील डिप्लोमा झालेला असल्याने भाऊ विशाल यास वरील कामकाजाकरीता शासकीय ठेक्याचे बांधकाम व इतर कामात योग्य ती मदत करतात.तक्रारदारांना मिळालेल्या कामापैकी पूर्ण झालेल्या कामाची बिले मिळालेली आहेत. परंतु सदर कामाच्या बिलामधून १० टक्के कपात केलेली सुरक्षा अनामत रक्कम जिल्हा परीषद लघु सिंचन विभागामार्फत सदर फाईलचे कामकाज पूर्ण झाल्यावर धनादेश स्वरुपात मिळणार आहे.

त्याकरीता तक्रारदार हे लघु सिंचन विभागात गेले. कनिष्ठ सहायक गुप्तेश चंद्रकात सुगंधी यांना भेटून लघु बंधारे बांधकाम पुर्ण केलेल्या कामांची १० टक्के सुरक्षा अनामत रक्कम धनादेश काढण्याबाबत विचारणा केली असता त्यांनी तक्रारदारांना सांगितले की, तुमच्या बिलाचे फाईलचे काम मी करून देतो त्या मोबदल्यात २ हजार ५०० रुपये लाचेची मागणी केली. सदर लाचेची रक्कम आज दि.२३ नोव्हेंबर २१ रोजी पंच व साक्षीदार यांच्या समक्ष जिल्हा परिषद, नंदुरबार येथील लघु सिंचन विभागातील कार्यालयात स्विकारली.

त्याला पंच-साक्षीदारांसमक्ष रंगेहाथ पकडण्यात आलेले आहे. सदर कामगिरी पोलीस अधिक्षक सुनिल कडासने, अप्पर पोलीस अधिक्षक सतिश भामरे, पोलीस उपअधिक्षक सुनिल कुराडे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान वाघ, पोलीस निरीक्षक श्रीमती माधवी समाधान वाघ, पोहवा उत्तम महाजन, पोहवा संजय गुमाणे, पोहवा विजय ठाकरे, पोना मनोज अहिरे,पोना दिपक चित्ते,मपोना ज्योती पाटील,पोना नावाडेकर, चापोना महाले यांच्या पथकाने केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com