
नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR
नवीन वर्षाच्या बंदोबस्तासाठी (New Year's resolutions) नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून (Nandurbar District Police Force) ९ पोलीस निरीक्षक, ३१ सहा. पोलीस निरीक्षक/पोलीस उपनिरीक्षक, ४५६ पोलीस अंमलदार असा एकुण ४९९ पोलीस अधिकारी व अंमलदारांचा बंदोबस्त पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, दारु पिवून (drinking alcohol) वाहन चालविणार्यांचे वाहन परवाने (vehicle licenses) रद्द करण्यात येणार आहेत.
नवीन वर्षाचे स्वागत उत्साहात व जल्लोषात करतांना कोणताही अनूचीत प्रकार घडू नये यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून खबरदारी म्हणून विविध उपायोजना करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत ठिक-ठिकाणी नाकाबंदी करुन दुचाकी, चारचाकी व इतर वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे बस स्थानक, रेल्वे स्टेशन, गर्दीचे ठिकाण व इतर महत्वाच्या ठिकाणी घातपात विरोधी तपासणी करण्यात येणार आहे.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी काही नागरिक सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करुन शांतता भंग करणारे तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणार्या इसमांविरुध्द् तसेच दारु पिऊन वाहन चालविणार्यांविरुध्द् विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.
.
दारु पिऊन वाहन चालवितांना आढळून आलेल्या वाहन चालकांचे परवाने (लायसन्स) निलंबन करण्याचे प्रस्ताव उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदुरबार यांचे कार्यालयात पाठवून त्यांच्यावर परवाने (लायसन्स) निलंबनाची कारवाई करण्यात येईल.
बसस्थानक, रेल्वेस्थानक, बाजारपेठ आदी गर्दीच्या ठिकाणी सोनसाखळी चोरी (चैन स्नॅचिंग), चोरी, पाकिटमार अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून साध्या वेषातील पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहेत.
गर्दीच्या ठिकाणी व बाजार पेठांमध्ये टवाळकी करुन मुलींची छेडछाड काढण्याच्या प्रकारांना थांबविण्यासाठी टवाळकी करणार्या युवकांविरुध्द् निर्भया पथकांकडून कठोर कायदेशीर कारवाई येणार आहे.
त्याचप्रमाणे नवीन वर्षाच्या स्वागताच्या उत्साहात काही समाज कंटकांकडून अनुचीत प्रकार होणार नाहीत यासाठी बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. तसेच फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सऍप, ट्विटर व इतर सोशल मीडियावर तेढ निर्माण करणार्या व खोट्या बातम्या प्रसारित करणारे व्हिडीओ, किंवा पोस्ट प्रसारीत करणार्यांविरुध्द् सायबर सेलमार्फत सोशल मीडियावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.
नवीन वर्षाच्या बंदोबस्तासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून ९ पोलीस निरीक्षक, ३१ सहा. पोलीस निरीक्षक/पोलीस उपनिरीक्षक, ४५६ पोलीस अंमलदार असा एकुण ४९९ पोलीस अधिकारी व अंमलदारांचा बंदोबस्त संपूर्ण पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तैनात करण्यात आला आहे