हद्दपार इसमासह अजामीनपात्र वॉरंटमधील आरोपीला अटक

जिल्ह्यात पोलिस दलातर्फे कोंबिंग ऑपरेशन
हद्दपार इसमासह अजामीनपात्र वॉरंटमधील आरोपीला अटक

नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी

आगामी येणारे सण उत्सव (Festivals) भयमुक्त वातावरणात पडावे यासाठी जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेतर्फे (local crime branch) कोंबिंग ऑपरेशन (Combing operation) राबविण्यात आले होते . दरम्यान नवापूर येथे 4 इसम जुगार खेळतांना (While gambling) मिळून आल्याने त्यांच्या ताब्यातून 20 हजार 260 रुपये रोख हस्तगत करण्यात आले असुन हद्दपार (deportation) इसमासह अजामीनपात्र वॉरंटमधील (non-bailable warrant) आरोपीला अटक (Accused arrested ) करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, हद्दपार इसमासह अजामीनपात्र वॉरंटमधील आरोपी अटक मागील काळात महाराष्ट्रात काही ठिकाणी दोन गटात झालेल्या जातीय दंगलीच्या पार्श्वभुमीवर समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर अंकुश राहावा तसेच आगामी येणारे सण उत्सव भयमुक्त वातावरणात पाडावेत व जिल्ह्यातील अभिलेखावरील आरोपी यांचे हालचालींवर नियंत्रण रहावे यासाठी खबरदारी म्हणून नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेने दि.18 जून रात्री 11 ते दि.19 जून 2022 चे पहाटे 5 वाजे दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले होते

. त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत कोंबिंग ऑपरेशन राबविणेबाबत आदेशीत केले होते . कोंबिंग ऑपरेशन दरम्यान नवापूर पोलीस ठाणे हद्दीत हॉटेल गार्डन येथे 4 इसम जुगार खेळतांना मिळून आल्याने त्यांच्या ताब्यातून 20 हजार 260 रुपये रोख हस्तगत करुन त्यांच्याविरुध्द् नवापूर पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

नंदुरबार जिल्ह्यात प्रलंबीत असलेल्या नॉन - बेलेबल वॉरंटपैकी नंदुरबार तालुका पोलीस ठाणे अभिलेखावरील प्रलंबीत असलेले 5 व अक्कलकुवा पोलीस ठाणे अभिलेखावरील 4 असे एकुण 9 नॉन बेलेबल वॉरंटची बजावणी करण्यात आली . तसेच नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या अभिलेखावर असलेले 58 हिस्ट्रीशिटर्स तपासण्यात आले आहे.

नंदुरबार जिल्हा हद्दीतुन 1 वर्षांसाठी हद्दपार केलेला महेंद्र धरम ठाकरे रा . डामरखेडा ता . शहादा हा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांची अथवा न्यायालयाची कोणतीही पूर्व परवानगी न घेता शहादा येथे मिळून आल्याने त्याच्याविरुध्द् महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे शहादा पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत . सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांच्या नेतृत्वाखाली अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , सहा . पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह संपूर्ण स्थानिक गुन्हे शाखेचे अमंलदार यांनी केलेली असुन पुढील काळात देखील कोंबिंग ऑपरेशन योजना संपुर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे .

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com