विधवा भावजयीला दिराने दिली जीवनसाथी म्हणून साथ

विधवा भावजयीला दिराने दिली जीवनसाथी म्हणून साथ

नंदुरबार । Nandurbar। प्रतिनिधी

कोरोनाने (Corona's) पतीच्या मृत्युनंतर (husband's death) दिराने जीवनसाथी (spouse) म्हणून हात देत बालिकेसह चेतना हीचा सांभाळ करण्याची जबाबदारी घेतली. दोघांचा विवाह (Marriage) मोठ्या थाटात पार पडला.

बोरणार ता. एरंडोल जि.जळगांव येथील रहिवासी सध्या नंदुरबार पोलीस दलात (Nandurbar Police Force) गेल्या 30 वर्षांपासून कार्यरत म्हसावद पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार किशोर बडगुजर यांना दोन मुली, एक मुलगा असे अपत्य आहेत. मोठी मुलगी हिचे लग्न झाले. तसेच दुसर्‍या क्रमांकाची मुलगी चेतना हिला डी.एड्. पर्यंत शिक्षण केले. कुसूंबा ता. जि. धुळे येथील रहिवासी उच्च शिक्षित पुणे येथे नामांकित कंपनीत उच्च पदावर कार्यरत असलेले संदिप चंद्रकांत बडगुजर यांचाशी सन 2015 मध्ये विवाहबद्ध (Marriage) करून मोठ्या थाटामाटात विवाह केला.

दोघांचा संसार सुखात चालु होता. त्यांचा संसाररूपी वेलीवर दिव्यांका नावाची कळी उमलली कुटुंबात आनंद उत्सव साजरा झाला. दिव्यांका पाच वर्षाची झाली. कोरोना (Corona's) महामारीत ऐन तारुण्यात संदिप चा पुणे येथे 27 एप्रिल 2021 रोजी मृत्यू झाला. त्यांचा सुखी संसाराला नजर लागली. संपूर्ण कुटुंब दुःखात बुडाले. चेतना पती विरहाने खचून गेली. चेतनाचे वडील सहाय्यक फौजदार किशोर बडगुजर यांनी मुलगी चेतना, नात दिव्यांका हिचा एक वर्ष सांभाळ केला.

समाजातील जेष्ठ, श्रेष्ठ, पदाधिकार्‍यांसह तसेच सासर व माहेर कडील मंडळींनी चेतनाची समजुत घालून विचार विनिमय करून चेतना व दिर हर्षल ऊर्फ किरण यांना भावी जीवनाची भूमिका पटवून सांगितली. चेतना व हर्षल यांनी सर्वांचे मत विचारात घेऊन कोणताही प्रकारचा अटी शतीॅ न ठेवता. दोघांनी एक दुसर्याचा जीवनात येवून खांद्याला खांद्या लावून संसार थाटायचा निर्णय घेतला. मुलगी दिव्यांका हिचे पालन पोषण व भविष्यातील सर्व सुख, दुःख सांभाळण्याची जबाबदारी घेऊन चेतनाचा स्विकार केला.चेतनानेही दिरा सोबत लग्न (Married with Dira) करण्यास संमती दिली. चेतनाचे आई वडील तसेच हर्षलचे आई वडील, नातेवाईक, समाज बांधवानकडून पुणे आळंदी येथे दिनांक 25 मे 2022 रोजी एकत्र येऊन समाजातील रूढी परंपरा नुसार मोठ्या थाटामाटात लग्न (Marriage) लावून दिले. चेतनाचा ऐन तारुण्यात पती निधनाचे दुःख जीवनात नैराश्य निर्माण करणारे होते.

मात्र दिर हर्षल याने खंबीर पणे साथ देवुन जीवन साथी म्हणून स्वीकारले. चेतनाचा जीवनातील दुःख, विरह नष्ट करण्याचा प्रयत्न हर्षल ने केल्याने सर्व स्तरावरून त्यांचावर प्रेमाचा वर्षाव होत आहे. दोघांना विवाहबद्ध(Marriage) करण्यासाठी समाजातील जेष्ठ, श्रेष्ठ, मान्यवर दिलीप नारायण बडगुजर, राजेंद्र नारायण बडगुजर, दिलीप गिरधर शिंदे, स्नेहलकुमार दिलीप शिंदे, संजय मधुकर बडगुजर,काशिनाथ उत्तम बडगुजर यांनी मोलाची भूमिका पार पाडली.

म्हसावद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्तीराव पवार यांनी दोघा उभयतांना पुष्पगुच्छ देऊन भावी आयुष्याचा शुभेच्छा दिल्यात. समाज बांधवानकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com