तीन दिवसांपूर्वीच विवाह झालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू

नववर्षाच्या पूर्वसंध्येला पटेल कुटुंबियांवर काळाचा घाला
तीन दिवसांपूर्वीच विवाह झालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू

शहादा | ता.प्र.- SHAHADA

मामाच्या मुलाच्या लग्नासाठी निझर येथून शहादा शहरातील शंकर विहार येथे आलेल्या तरुणाला (young man) मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने जागीच ठार (death) झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे. अपघातातील (Accident) मयत प्रदीपकुमार उर्फ राहुल प्रल्हाद पटेल याचा दोन दिवसांपूर्वीच विवाह झाला होता.

नववर्षाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या दुर्दैवी घटनेने पटेल परिवारावर शोककळा पसरली पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना काल रात्री 9 वाजेच्या सुमारास डोंगरगाव चौफुलीजवळ घडली. घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनेतील ट्रक जप्त केला असून चालक फरार आहे. दरम्यान, जखमीस सुरत येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

शहरातील शंकर विहार सोसायटीत वास्तव्यास असलेले छोटूलाल पटेल (रा.पाडळदा ह. मु. अमेरिका) यांच्या मुलाच्या विवाहासाठी प्रदीपकुमार उर्फ राहुल प्रल्हादभाई पटेल (वय२८) (रा. निझर, गुजरात) व प्रशांत पुरुषोत्तम पटेल (वय ३०, (रा. दहिंदुले ता.नंदुरबार) हे दोघे युवक शहरातील डोंगरगाव रस्त्याकडून शंकर विहारकडे स्कुटीने (क्र. एम. एच.३९सी.०२६०) जात असताना लोणखेडाकडून दोंडाईचाकडे पपईने भरलेला ट्रक (क्र. एम.पी. ०६ एच १६४९) भरधाव वेगाने लोणखेडा बायपास रस्त्याने जाताना पुढे चालत असलेल्या स्कुटीला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की त्यात स्कुटीचा चक्काचूर झाला असून प्रदीपकुमार उर्फ राहुल प्रल्हादभाई पटेल हा जागीच ठार झाला. तर प्रशांत पटेल गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी सुरत येथे खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

दरम्यान, तिरुपती तुकाराम पाटील यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक छगन चव्हाण करीत आहेत.

तात्काळ पोलीस दाखल

घटनास्थळी नातेवाईकांची गर्दी व मोठ्या प्रमाणावर मोठा जमाव जमला होता. घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलिस निरीक्षक राजन मोरे यांनी तात्काळ कर्मचाऱ्यांसह धाव घेत संतप्त जमावावर नियंत्रण मिळविले, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.

प्रदीपकुमारचा अवघ्या तीन दिवसांपूर्वीच झाला विवाह

दरम्यान, मयत प्रदीपकुमार पटेल हे कॅनडा येथे नोकरीला होते. काही दिवसांपूर्वीच ते स्वत:च्या लग्नासाठी गावी निझर येथे आले होते. अवघ्या तीन दिवसांपूर्वी त्यांचा कौठळ (ता.शहादा) येथे विवाह झाला होता. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. विवाहानंतर ते पावागढ येथून कालिकादेवीचे दर्शन घेऊन नुकतेच शहादा येथे मामाच्या मुलाच्या विवाह सोहळ्यासाठी आले असता क्रूरकाळाने त्यांच्यावर नववर्षाच्या पूर्वसंध्येला घाला घातला. या संपूर्ण घटनेने पटेल परिवारासह नववधुच्या परिवारावर शोककळा पसरली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com