चरणमाळ घाटात पुन्हा अपघात

कांद्याने भरलेला ट्रक उलटला
चरणमाळ घाटात पुन्हा अपघात

नवापूर Navapur। श.प्र.

तालुक्यातील चरणमाळ घाटात (Charanmal Ghat) काल मध्यरात्री पुन्हा कांद्यानी भरलेला ट्रक (truck full of onions) तीव्र उताराच्या वळणावर पलटी झाल्याने (Due to reversal) वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात चालक व सहचालक (Driver and co-driver) किरकोळ जखमी (Injured) झाले आहेत.

सदर ट्रक पिंपळनेरहून नवापूरकडे कांदे घेऊन जात असताना अपघात झाला. कालच या ठिकाणी गुजरात परिवहन महामंडळाची एक बस दरीत कोसळणार होती, परंतु चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी जिवीतहानी टळली होती. धुळे नंदुरबार या महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांच्या जवळ व महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाण्यासाठी कमी अंतराचा रस्ता म्हणून वाहन चालक या रस्त्याचा वापर करतात.

परंतु डोंगरदर्‍याच्या या रस्त्यात चरणमाळ गावाखाली असलेला घाट रस्ता अतितीव्र वळण उताराचा असल्याने मालवाहू वाहने अनियंत्रित होऊन अपघात होतात. सदर घाट रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्ती करावी जेणेकरून अपघात टाळता येईल अशी मागणी केली जात आहे.

चरणमाळ घाट रस्त्यात अपघात झाल्यानंतर गाडीमधील मालाची लूट व्हायची. ही लूट थांबावी यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील, नवापूर पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी बैठका घेऊन ग्रामसुरक्षा दल स्थापन केल्याने लूट थांबली आहे. अपघात होताच ग्राम सुरक्षा दलाच्या वतीने तत्काळ मदत केली जाते. पोलीस विभागाने उपाययोजना केल्या असून सार्वजनिक बांधकाम विभागाने देखील घाट दुरुस्तीकडे उपाययोजना करावी अशी मागणी केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com