नंदुरबार Nandurbar। प्रतिनिधी
शैक्षणिक सद्यस्थिती, सामाजिक सद्यस्थितीवर चर्चा करीत शिक्षण क्षेत्रातील (Education sector) गैरकाराभारावर आसूड ओढत विद्यापीठ दुरुस्ती कायद्याच्या (University Amendment Act) विरोधात पूर्ण महाराष्ट्रात 1 कोटी स्वाक्षरी (Signature) मोहिम राबविण्याचा निर्धार येथे झालेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (Akhil Bharatiya Vidyarthi Parishad) 56 वे प्रदेश अधिवेशनाच्या (State Convention) समारोपाप्रसंगी करण्यात आला.
सर्व विद्यापीठे, जिल्हाधिकारी कार्यालयावर आसूड आंदोलन, (Asud movement) तिरडी आंदोलन, ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.या नंतर देखील शासनाने सदर कायदे मागे न घेतल्यास मंत्रालयावर (Mantralaya) धडक मोर्चा (Morcha) अभाविपच्या वतीने काढण्यात येणार आहे.
नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात बाल हुतात्मा शिरीषकुमार नगरीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे 56 वे प्रदेश अधिवेशन (State Convention) घेण्यात आले. भाषण सत्रात तीन प्रस्ताव सादर करण्यात आले. यामध्ये यामध्ये शैक्षणिक सद्यस्थिती यावर पश्चिम महाराष्ट्राचे प्रदेशमंत्री अनिल ठोंबरे यांनी प्रस्ताव सादर केला.यात कोरोना काळामध्ये महाविद्यालय बंद असतांना ज्या सुविधांचा उपयोग विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष घेतला नाही तरी देखील विद्यापीठ (University) व महाविद्यालयांमध्ये (Colleges) विविध शुल्क आकारण्यात आलेले आहे. याबाबत राज्य शासनाने शैक्षणिक वर्ष 2021-22 करीता विविध शुल्क (Fees) माफीचा निर्णय घेतला. परंतु अद्यापही या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. म्हणूनच महाराष्ट्र शासन विद्यार्थ्यांची (students) फसवणूक करत आहे. असे अभाविपचे 56 वे महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन, नंदुरबार मत व्यक्त करीत आहेत.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (National Education Policy) 35 वर्षानंतर येवू घातलेले आहे. अनेक राज्यांनी या विषयी प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केलेली आहे. शिक्षण क्षेत्रणात महाराष्ट्र राज्य दिशादर्शक राहिलेले आहे. परंतु सध्याचे महाराष्ट्र शासन (Government of Maharashtra) या धोरणबाबत कमालीचे उदासीन असल्याचे दिसन येत आहे. यावर अभाविपचे 45 वे महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनमध्ये चिंता व्यक्त करण्यात आली. सीईट सेलची निर्मिती 2015 या वर्षी झाली. परंतु अद्यापही प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडत नाहीत तरी हा सीईटी सेल अद्यावत करावा असे आवाहन अभाविपचे 56 वे महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन व्यक्त करण्यात आले.
तर सामाजिक सद्यस्थिती यावर धुळे येथील शहरमंत्री भावेश भदाणे यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जन्म दिवस दिनांक 15 नोव्हेंबर हा भारत सरकारने जनजाती गौरव दिवस म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले. या निर्णयाचे अभाविपने स्वागत केले. महाराष्ट्र शासनाने किरणा मालाच्या दुकानात वाईन (Wine) विकण्यास परवानगी दिली आहे. हा निर्णय महाराष्ट्राच्या संस्कृतीस काळीमा फासणारा आहे.
एकीकडे सज्जन शक्ती भारताला नशा मुक्तीच्या दिशेने घेवून जात असतांना महाराष्ट्र शासनान तरूणाईला व्यसनाधिनतेच्या गर्तेत लोटत आहे. महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाबाबचा अभाविपतर्फे (Akhil Bharatiya Vidyarthi Parishad) निषेध करीत आहे. नंदुरबार जिल्हा जनजाती जिल्हा असून या भागातील शाश्वत विकासाच्या दृष्टीकोनातून जनजाती समाजाचे आराध्य दैवत देवमोगरा माता, दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द असलेले प्रकाशा, थंड हवेचे ठिकाणी तोरणमाळ आदी स्थानांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करून रोजगार निर्मिला चालना मिळेल अशा उपाययोजना शासनाने कराव्यात, असे आवाहन अभाविपच्या अधिवेशनात करण्यात आले.
देवगिरी प्रांताच्या अंकिता पवार यांनी शिक्षण क्षेत्रातील गैरकाराभारावर आसूड यावर प्रस्ताव सादर केले.यावेळी विद्यापीठ दुरुस्ती कायद्याच्या विरोधात पूर्ण महाराष्ट्रात 1 कोटी स्वाक्षरी मोहिम येत्या काळात घेण्यात येणार आहे.महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठे, जिल्हाधिकारी कार्यालयावर असूड आंदोलन, तिरडी आंदोलन, ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. या नंतर देखील शासनाने सदर कायदे मागे न घेतल्यास मंत्रालयावर धडक मोर्चा अभाविप च्या वतीने काढण्यात येणार आहे.
आळंदी येथे प्रतिभासंगम
मार्च महिन्याच्या सुरवातीला राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलन प्रतिभासंगम हे संत ज्ञानेश्वरच्या 750 व्या जयंती वर्षानिमित्त आळंदी येथे करण्यात येणार आहे. एप्रिल महिन्यामध्ये नमन इस मिट्टीको अभियाना अंतर्गत संपूर्ण प्रांतातील क्रांतिकारकांचा, स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास असलेल्या ठिकानांची माती चे पूजन करण्यात येणार आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती ही नाचून नाही तर वाचून साजरी व्हावी या साठी अभाविप वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे
दरम्यान, दि.12 रोजी सायंकाळी झालेल्या परिसंवादात नवीन विद्यापीठ कायद्यात दुरुस्तीवर चर्चा करण्यात आली.सदरच्या चर्चेत उमविचे सिनेट सदस्य दिलीप पाटील यांच्यासह डॉ.प्रशांत साठे, प्रेरणा पवार, प्रा.सारंग जोशी, प्रा.निर्भय विसपुते, अनिल ठोंबरे, अंकिता पवार यांनी सहभाग नोंदविला.
परिसंवादादरम्यान कोणतीही चर्चा न करता दबावतंत्रचा वापर करत नवीन विद्यापीठ कायदा दुरुस्ती करण्यात आल्याने यात बदल होईपर्यंत विद्यार्थी परिषदेकडून आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, काल सकाळी झालेल्या सभेप्रसंगी सहा विविध विषयांवर मनोगते व्यक्त करण्यात आली. यामध्ये महिला सुरक्षा, एस.टी. आंदोलन, विद्यापीठ कायदा, पेपर घोटाळे, दबावात्मक राजकारण आदी विषयांवर अभाविपच्या राष्ट्रीय मंत्री प्रेरणा पवार, देवगिरी व पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रदेश अध्यक्ष निर्भय विसपुते, सारंग जोशी, प्रदेशमंत्री अंकिता पवार, अनिल ठोंबरे, छात्रनेते शुभांगी नाईक आदींनी मनोगत व्यक्त केले.
दरम्यान, उद्घाटनाच्या दिवशी सायंकाळी होळी नृत्य, गणपती लेझीम व डोंगर्यादेव नृत्य सादर करत संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले.