धडगाव तालुक्यातील दोघं अल्पवयीन मुलींचे अपहरण

वेगवेगळे दोन गुन्हे दाखल
crime news
crime news

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

धडगाव तालुक्यातील दोघा अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत पोलीस (police) सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धडगाव तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीस जयसिंग उर्फ पिंटू बोडख्या पावरा (रा.तेलखेडीचा आठोरीपाडा ता.धडगाव) याने काही तरी फूस लावून पळवून नेले.

याबाबत संबंधीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार धडगाव पोलीस ठाण्यात जयसिंग पावरा याच्याविरुद्ध भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण महाले करीत आहेत.

दुसर्‍या घटनेत याच तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीस महेंद्र खेमा वसावे (रा.बिजरी ता.धडगाव) याने काही तरी फूस लावून पळवून नेले. याबाबत संबंधीत मुलीच्या मामाने दिलेल्या फिर्यादीनुसार धडगाव पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार स्वप्नील गोसावी करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com