अबब! घोडयाची किंमत तब्बल 11 कोटी !

अबब! घोडयाची किंमत तब्बल 11 कोटी !

सारंगखेडयात दाखल झाला राजेशाही थाटाचा ‘अल्बक्ष’

सारंगखेडा Sarangkheda । वार्ताहर-

एखाद्या मोठ्या उद्योगपतीकडे 11 कोटीची कार नसेल, पण येथील अश्व बाजारात (Horse market) दाखल झालेल्या अल्बक्ष (Albax) या घोडयाची किंमत (price of this horse) तब्बल 11 कोटी आहे. यावर कुणाचा विश्वास बसणार नाही, पण हे सत्य आहे. त्याचा खुराक आणि देखभालीचा खर्च महिन्याकाठी लाखावर आहे. या अश्वाची राहण्याची व्यवस्था एका एसी गाडीमध्ये करण्यात आली आहे. त्याला राईडिंग (Riding) साठीच फक्त बाहेर काढण्यात येते हे विशेष.

अल्बक्षचे काल पहाटे सारंगखेडयात आगमन झाले. अश्वमालक आर.पी.गील (रा.लुधीयाना, पंजाब) यांचे स्वागत चेतक फेस्टीव्हल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल व प्रणवराजसिंह रावल यांनी केले. सारंगखेडा येथील यात्रोत्सवानिमित्त भरणार्‍या अश्व बाजार हा देशाच्या घोडे बाजाराचे नेतृत्व करतो. या अश्व बाजाराला चेतक फेस्टीव्हलची जोड मिळाली आहे. या अश्व बाजारात 1500 अश्वांपैकी पाचशेहून अधिक अश्वांची किमंत लाखांवर आहे. आतापर्यंत 2019 मध्ये शान नावाचा सर्वात महागडा अश्व 10 कोटी रुपयांचा आला होता. यंदा मात्र त्या किंमतीचा विक्रम मोडून भारतातील अश्व चॅम्पियन अल्बक्ष नावाचा अश्व ज्याची किमंत तब्बल 11 कोटी रुपये आहे. त्याच्या खाण्यापिण्यासह देखरेखीवर महिन्याला एक लाखांवर खर्च आहे. याशिवाय पंजाबमध्ये झालेल्या अश्व स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवला.अलीसा इंसुदे देह दरबार अशी ब्लडलाईन आहे. त्याचे वय 4 वर्ष आहे. उंची 6 फुट 8 इंच इतकी आहे. अश्व बाजारात एसी टेंटमध्ये व्हीआयपी कक्षात त्याची 50 बाय 50 च्या जागेवर राजेशाही थाटात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. चेतक फेस्टीव्हलमध्ये दरवर्षी राजकीय नेते, सिने अभिनेते, अभिनेत्री सेलिब्रिटी येतात. यंदा या ठिकाणी अल्बक्ष नावाचा अश्वच सेलिब्रिटी झाला आहे. अश्वांचा राजा असलेला व भारतातील चॅम्पियन ठरलेला आहे.

अश्वाचा राजेशाही थाट

सेवेसाठी दोन सेवेकरी. कक्षाच्या बाहेर येताना होणारी पूजा. पूजेची देखील विशिष्ट पद्धत. अंगाला उष्णता लागू नये म्हणून केली गेलेली काळजी.. कक्षात परत जाताना होणारी पूजा... काढली जाणारी दृष्ट... हे कोणा एका राज्याच्या राजपुत्राचे वर्णन नसून येथील अश्व बाजारात आलेल्या अकरा कोटी रुपये किमतीच्या अश्वाचा हा राजेशाही थाट आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com