लग्न करण्यास नकार दिल्याने तरुणीला जीवे ठार मारण्याची धमकी

Crime news
Crime news

नंदुरबार nandurbar । प्रतिनिधी

लग्न करण्यास नकार (Refusal to marry) दिल्याच्या करणावरुन तरुणीवर (young woman) अ‍ॅसिड टाकून जिवे ठार मारण्याची (Death threats) धमकी दिल्याप्रकरणी एकाविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा येथील नितीनगरात राहणार्‍या 33 वर्षीय ब्युटीशियनने नागसेन नगरातील रहिवासी चेतन मुलचंद तिरमले याच्याशी लग्न करण्यास नकार दिला.

या कारणावरुन दि.1 मे रोजी साडे सहा वाजेच्या सुमारास ब्युटीशियन व त्यांचा मित्र चार चाकी वाहनाने सार्थक हॉस्पीटल येथुन डोंगरगाव रोडने घरी नितीननगर येथे जात असतांना योगेश फार्निचर या दुकानासमोर रोडवर चेतन तिरमले याने गाडी अडवली व हातातील दगड गाडीवर मारले, दगड क्लिनर साईडला मागील दरवाज्याच्या बाजुला टोचा पडला तसेच त्याने बोनटवर बुक्का मारला व तू बाहेर निघ अशी धमकी दिली.

तसेच माझ्यासोबत लग्न कर नाहीतर मी तुला जिवेठार मारुन टाकेल, तुझ्याबर अ‍ॅसीड टाकेल तसेच वाईट वाईट शिवीगाळ केली. याबाबत संबंधीत ब्युटीशियनने दिलेल्या फिर्यादीनुसार शहादा पोलीस ठाण्यात भादंवि कलम 341, 427, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना किरण पावरा करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com