धक्कादायक ; विद्युत खांबावरून सात तासानंतर उतरवला युवकाचा मृतदेह

अमळथे (ता.नंदुरबार) येथील घटना, संतप्त नातेवाईकांचा मृतदेह घेण्यास नकार, आश्वासनानंतर सुटला तिढा
धक्कादायक ; विद्युत खांबावरून सात तासानंतर उतरवला युवकाचा मृतदेह

नंदुरबार-प्रतिनिधी nandurbar

नंदूरबार तालुक्यातील अमळथे येथे विद्युत खांबावर (Electric pole) चढलेल्या युवकाचा विद्युत तारांचा स्पर्श होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान काल दि.१४ जानेवारी रोजी दुपारी ३.१५ वाजेक्या घटनेनंतर पोलिसांच्या उपस्थितीत ७ तासानंतर रात्री १०.३० वाजेच्या सुमारास युवकाचा मृतदेह पोल वरून खाली काढण्यात आला.

आज सकाळ पासून संतप्त नातेवाईकांनी मृतदेह घेण्यास नकार देत जिल्हा रुग्णालयाच्या आवारात उभे आहेत. दरम्यान रुग्णालयात महावितरण कर्मचारी (MSEDCL staff), खासदार व आमदार चर्चेसाठी दाखल झाले असून १२.३० वाजेपर्यंत त्यांची चर्चा सुरू होती.

अमळथे ता.नंदुरबार येथील तरुण शेतकरी पंकज दरबारसिंग गिरासे (वय 32) हा ट्रांसफार्मर बसण्याच्या ठिकाणी हजर असताना त्या तरुणास जाधव नामक वायरमनने 11 kv च्या एग्रीकल्चर लाईन फिडरच्या वरती झंपर जोडण्यासाठी खांबावरती चढण्यास विनंती केली.

जाधव वायरमन यांनी सांगितले मी महावितरणच्या सबस्टेशनच्या ऑपरेटर कर्मचारी यांना फोन करून लाईट बंद करायला लावलेली आहे. तू बिनधास्त चढ काय घाबरू नको असं म्हणत पंकज याला मुख्य थ्री फेज खांबावरती चढण्यास भाग पाडले. पंकज खांबा वरती चढला व जसा त्याने विद्युत वाहक तारांना स्पर्श करतात तो तारांना चिटकला त्यात त्याचे पूर्ण शरीर काळपट झाले व त्याच ठिकाणी पंकज या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

ही घटना काल दि.१४ जानेवारी रोजी दुपारी ३.१५ वाजेक्या घटनेनंतर पोलिसांच्या उपस्थितीत ७ तासानंतर रात्री १०.३० वाजेच्या सुमारास युवकाचा मृतदेह पोल वरून खाली काढण्यात आला.

जिल्हा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रात्री सदर शेतकरी युवकाचा मृतदेह आणण्यात आला आहे. आज सकाळपासूनच जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात संतप्त नातेवाईक व गावकरी जमा झाले होते.त्यांनी अमळथे येथे विजेच्या खांबावर शेतकऱ्यांचा मृत्यूप्रकरणी. त्याच्या लहान भावाला नोकरी द्यावी व पन्नास लाख सानुग्रह मदत द्यावी अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

मागणी मान्य होत नाही तो पर्यंत मृतदेह घेणार नाही असा पवित्रा घेतला आहे. जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला होता. त्याठिकाणी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना चर्चेसाठी बोलवण्यात आले असून सदर चर्चेच्या ठिकाणी खा.डॉ.हिना गावित व आ.डॉ.विजयकुमार गावित दाखल झाले त्यानंतर त्यांच्यात चर्चा करण्यात येत आहे.

या बैठकीत युवकाच्या कुटुंबीयांना अंत्यविधीसाठी २० हजार रूपये देण्यात आले. तसेच शिक्षणा प्रमाणे नोकरीचे आश्वासन देण्यात आले असून ४ लाखाची भरपाई ही देण्याचे आश्वासन यावेळी वीज वितरणाच्या कर्मचाऱ्यांनी दिले. त्यानंतर १.३० वाजेच्या सुमारास मृतदेह गावाकडे नेण्यात आला.

Related Stories

No stories found.