टायर फुटल्याने कार नदीत कोसळली, सहा जण जखमी

टायर फुटल्याने कार नदीत कोसळली, सहा जण जखमी

नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी

सुरतहून नंदुरबारकडे जाणार्‍या स्विफ्ट डिझायर कारचा (Swift Dzire car) टायर फुटल्याने (tire burst) मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास अपघात (accident) झाला आहे. कार चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट कठडे नसलेल्या पुलाचे लोखंडी खांब तोडून नदीत कोसळली (Fell into the river). या अपघातात तीन पुरुष,दोन महिला,सहा महिन्याच्या बालक (six people) जखमी (injuring) झाले. त्यांना उपचारासाठी नंदुरबार येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुरतहून नंदुरबारकडे जाणार्‍या स्विफ्ट डिझायर ( क्र.जी.जे.01, आर. ए.2994) या कारचे मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास तयार फुटल्याने कार चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट कठडे नसलेल्या पुलाचे लोखंडी खांब तोडून नदीत कोसळली. अपघात होतात पोलीस व स्थानिकांनी जखमींना कारमधून बाहेर काढले व रुग्णालयात नेले.

या अपघातात रमेश पाटील, कल्पेश देवरे, अश्विनी देवरे,अशोक पाटील, निलिमा पाटील व सहा महिन्यांचा बालक. सर्व रा. जगताप वाडी, नंदूरबार, जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नंदुरबार येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी पुढील तपास विसरवाडी पोलिस करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com