अनरदजवळ धावत्या बुलेटचा स्फोट

मोटरसायकलचालक गंभीर जखमी, बुलेट पूर्णतः खाक
अनरदजवळ धावत्या बुलेटचा स्फोट

शहादा | ता.प्र. - SHAHADA

शहादा येथून शिरपूरकडे बुलेटवर (bullet) जात असतांना अनरद टेकडीजवळ अचानक बुलेटचा स्फोट होऊन (bullet exploded) चालक गंभीररीत्या भाजला (driver suffered severe burns) गेल्याची घटना आज दुपारी साडे तीन वाजता घडली. गंभीर अवस्थेत त्यास धुळे येथे उपचारार्थ दाखल (admitted for treatment) करण्यात आले आहे. या घटनेत बुलेट पूर्णतः जळून खाक झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश तिरमले (रा.नितीननगर,शहादा) हे त्यांच्या पांढर्‍या रंगाच्या बुलेट मोटरसायकलने शहादा येथून शिरपूरकडे जात होते. दुपारी चार वाजेच्या सुमारास दोंडाईचा-शिरपूर रस्त्यावरील अनरद टेकडीजवळ अचानक धावत्या बुलेटला आग लागून स्फोट झाला.

हा स्फोट एवढा जबरदस्त होता की काही सेकंदातच प्रकाश तिरमले गंभीररित्या भाजले जाऊन रस्त्याच्या बाजूला फेकले गेले. स्फोटाचा आवाज ऐकून रस्त्यालगत व शेतात असलेले लोक घटनास्थळी धावून आले. घटनेची माहिती शहरात पोहचताच नातेवाईकांनी तात्काळ धाव घेत रुग्णालयात दाखल केले.

मात्र गंभीर भाजल्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना धुळे येथे हलविण्यात आले आहे. या स्फोटामुळे बुलेट मोटरसायकल पूर्णतः जळून खाक झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com