गंगापूर येथे धावत्या ट्रकला भिषण आग

गंगापूर येथे धावत्या ट्रकला भिषण आग

नवापूर Navapur । श.प्र.

लोखंडाने भरलेल्या मालट्रकचे (Cargo truck) टायर गरम होऊन लागलेल्या आगीत (fire) ट्रक जळून खाक (burn up) झाला. मात्र वेळीच चालक व सहचालकाने सावध होत पेटत्या ट्रकपासून दुर झाल्याने जिवीतहानी टळली.

गंगापूर येथे धावत्या ट्रकला भिषण आग
Makeup Part 5 : असा करा कियारा, कतरीना व आलिया सारखा नैसर्गिक मेकअप

तालुक्यातील विसरवाडी पासुन तीन कि.मी.अंतरावर असलेले राष्ट्रीय महामार्गावरील गंगापूर गावाच्या शिवारात ,महामार्गावर दुपारी चार वाजता धावता मालट्रक (क्र.जी.जे 26 यु 9646) हा आंध्रप्रदेश हुन भावनगर येथे लोखंड भरून जात असताना मालट्रक चा टायर गरम झाल्याने अचानक आगीच्या ठिनग्या निघत असल्याने चालकाच्या लक्षात आले. चालकाने ट्रक उभी करून बघितले असता आगीने क्षणात रोद्र रुप धारण केले बघता बघता संपूर्ण मालट्रक ला आग लागली दुर दुर पर्यंत आग व धुर दिसु लागले ,मालट्रक संपूर्ण जळुन खाक झाला.या मालट्रक वरील चालक व सहचालक घाबरून दुर पळवुन गेल्याने जिवीतहानी टळाली अन्यथा मोठा अनर्थ झाला असता.

आग इतकी भयानक होती की टायर फुटण्याचे आवाज दुर पर्यंत येत असल्याने आजुबाजुचे नागरिक,हॉटेल व्यावसायीक भयभीत झाले होते.विसरवाडी पोलीस ठाण्यात सदरची माहिती मिळताच घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, उप.नि.भुषण बैसाणे, पो.कॉ.पिंटु पावरा. अतुल पानपाटील दाखल झाले. आणि अग्निशमन दला फोन करून पाचारण करण्यात आले ,मालट्रक ला महामार्गावर आग लागल्याने रस्त्यावर दोन्ही बाजुने वाहतूक ठप्प झाली आहे.

गंगापूर येथे धावत्या ट्रकला भिषण आग
Makeup Part 4 # असा करा Self makeup
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com