पाच मुलांसह बेपत्ता झालेली महिला सुरतला आढळली

पतीच्या जाचाला कंटाळून गेल्याचे निष्पन्न
पाच मुलांसह बेपत्ता झालेली महिला सुरतला आढळली

नंदुरबार Nandurbar। प्रतिनिधी

लोणखेडा(Lonakheda) ता.शहादा येथून पाच मुलांसह (five children) बेपत्ता झालेल्या महिलेला (missing woman) सुरत (Surat) येथून ताब्यात (In possession) घेण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहादा पोलीस ठाण्यात आरती संजय पाथरवट (वय 30) ही धुणीभांडीच्या कामासाठी जाते असे सांगून ती तिची 5 मुले मिनाक्षी संजय पाथरवट (13), तनिषा संजय पाथरवर (12), उन्नती संजय पाथरवट (10), गायत्री संजय पाथरवट (7) व कार्तिक संजय पाथरवट (4) यांच्यासह दि.6 ऑगस्ट 2021 रोजी कुठेतरी निघून गेली होती. याबाबत तीचे सासरे अनिल अर्जुन पार्थवट यांनी खबर दिल्याने हरविल्याची नोंद पोलीसांत करण्यात आली होती.

महिलेसह 5 मुले हरविल्याने तसेच दीड महिन्याच्या वर कालावधी होऊनदेखील काही ठाव ठिकाणा लागत नसल्याने सदर प्रकरणाचे संवेदनशिलता ओळखून यात अनैतिक मानवी वाहतुकीचा प्रकार होऊ शकतो ही शक्यता लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी सदर मिसिंग प्रकरणाचा तपास करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना आदेशीत केले.

त्यानुसार श्री.कळमकर यांनी पोहवा प्रमोद सोनवणे, पोना विकास कापुरे, पुरुषोत्तम सोनार, पोकॉ यशोदिप ओगले यांचे पथक तयार केले. पथकाने संबंधीत महिला ही सध्या सुरत वेरली गावाजवळ जीआयडीसीमध्ये वास्तव्यास असल्याची खात्रीशिर माहिती काढली. त्यानुसार पथकाने वेरली गावाजवळ जीआयडीसीमध्ये 5 किलोमिटर परिघातील महाराष्ट्रातील लोकांचे वस्त्यांमध्ये फिरुन महिला व मुलींचे फोटो दाखवुन महिला व मुलींचा शोध लावुन त्यांना नंदुरबार येथे आणले.

आरती संजय पाथरवट हीने तिचा पती दारुच्या व्यसनाच्या आहारी गेल्याने तसेच कामधंदा न करता सतत भांडण करतो, कामधंदा नसल्याने मुलांवर उपासमारीची वेळ आल्याने तीने सर्व मुलांसह कामधंद्यासाठी सुरत गाठल्याचे सांगितले. महिलेची परिस्थिती पहाता तिला सर्व मुलांचे संगोपन एकट्याने करणे जिकीरीचे होणार असल्याने नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे मार्फतीने एनजीओंकडून मदत मिळुन मुलींचे शिक्षणासाठी मदत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

सदर कामगिरी पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधिक्षक विजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोहवा प्रमोद सोनवणे, पोना विकास कापुरे, पुरुषोत्तम सोनार, पोकॉ किरण मोरे, यशोदिप ओगले, मपोहवा विजया बोराडे यांच्या पथकाने प्रकरणाची संवेदनशिलता ओळखुन तपास केल्याबद्दल पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.

Related Stories

No stories found.