
नंदूरबार nandurbar । प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील लक्कडकोट येथील मारहाण (case of killed) प्रकरणी शहादा येथील न्यायालयाने (court) एकास दोषी ठरवत 2 वर्ष 2 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 30 दिवसाची कैदेची शिक्षा (punishment) सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहादा तालुक्यातील लक्कडकोट येथील जगदीश मुलचंद गोले हा त्यांच्या घरी असतांना मोहन दुलीचंंद गोले हा तेथे आला व त्याने तेथे पडलेल्या विटा साफ करण्याचा कोयत्याने जगदीश गोले यांच्या डोक्यावर व डाव्या हाताच्या पंज्यावर मारले त्यामुळे त्याच्या हाताचा पंजा फॅक्चर झाला.
त्याबाबत फिर्यादी याने म्हसावद पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास करून तपासाधिकारी यांनी आरोपी मोहन गोले यांच्या विरुध्द शहादा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले.
सदर केसमध्ये सरकार पक्षातर्फे 7 महत्वपूर्ण साक्षीदारांचा साक्षीपुरावा नोंदविण्यात आला. सदर साक्षीदारांनी दिलेल्या पुराव्यातून आरोपी याने फिर्यादी याला विटा साफ करण्याच्या कोयत्याने डोक्यावर व डावा हाताच्या पंज्यावर मारुण हाताचा पंजा फॅक्चर केला अशा महत्वपुर्ण पुरावा न्यायालयासमोर आल्याने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट नं. 2 यांनी आरोपी मोहन गोले याला गुन्हा साबीत झाल्यामुळे त्यास भा.द.वि.क. 326 नुसार 2 वर्ष साधी कैद व 2 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 30 दिवस साध्या कैदेची शिक्षा सुनावणी आहे.सदर केसमध्ये सरकारपक्षातर्फे सरकारी अभियोक्त म्हणुन राहूल डी. बिर्हाडे यांनी कामकाज पाहीले.