प्रकाशा येथे आदिवासी दिनाच्या पूर्वसंध्येला मिरवणूक

प्रकाशा येथे आदिवासी दिनाच्या पूर्वसंध्येला मिरवणूक

प्रकाशा | वार्ताहर - PRAKASHA

येथे आदिवासी दिनाच्या (Adivasi Day) पूर्वसंध्येला शहरात ढोलताशा, डीजेच्या गजरात (beat of the drummer, the DJ) प्रचंड मिरवणूक (huge procession) काढण्यात आली.

९ ऑगष्ट या जागतिक आदिवासी दिवसाचे औचित्त साधून प्रकाशा येथे पूर्वसंध्येला प्रचंड मिरवणूक काढण्यात आली. या प्रसंगी गावातील, परिसरातील असंख्य गावातील आदिवासी बांधव हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.

वाजंत्री, डीजेच्या तालात आपली संस्कृती आणि अस्मिता जपत पूर्ण गावातून सायंकाळी उशिरापर्यंत हजारो बांधव नाचत एकलव्याचे मोठे बॅनर लावून मोठी रॅली काढण्यात आली. जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला.

जागतिक आदिवासी दिवसाचे अधिक महत्व असले तरी प्रत्येक गावातील समाजाच्या समस्या आणि नियोजनाच्या माध्यमातून येथील समाजाचा पदाधिकार्‍यांनी निर्णय घेऊन प्रकाशा येथे साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. ८ ऑगष्ट रोजी तळोदा, तसेच ९ आगष्ट रोजी जिल्हाभरात जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात येणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com