Photos # शहाद्यात सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त भव्य एकता रॅली

महिलांच्या हातातील ११५ मीटर लांबीच्या तिरंग्यासह विविध हुबेहूब देखाव्यांनी वेधले नागरिकांचे लक्ष
 Photos # शहाद्यात सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त भव्य एकता रॅली

शहादा | ता.प्र.- SHAHADA

येथे सरदार वल्लभभाई पटेल युवा फाउंडेशन (Sardar Vallabhbhai Patel Youth Foundation) व लेवा पाटील गुजर समाज मंडळ (Lewa Patil Gujar Samaj Mandal)यांच्यातर्फे भारताचे माजी गृहमंत्री व भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल (Bharat Ratna Sardar Vallabhbhai Patel) यांची जयंती (Jayanti) मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.जयंतीच्या माध्यमातून भव्य एकता रॅली (Unity Rally) काढण्यात आली. रॅलीच्या सुरुवातीला महिलांनी ११५ मीटर लांबीच्या तिरंगा (tricolor) हातात धरलेला होता. रॅलीत वेगवेगळे हुबेहूब सादर केलेले देखावे मुख्य आकर्षण ठरले. पहिल्यांदाच एवढ्या भव्य स्वरूपात सरदार पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली.

शहरातील प्रथम गुजर गल्लीमधील महात्मा गांधी चौकात आ. राजेश पाडवी व सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी माजी नगराध्यक्ष मोतीलालतात्या पाटील, नगरपालिकेचे माजी गटनेते मकरंद पाटील, जि.प.चे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, जि.प.चे माजी कृषी सभापती अभिजीत पाटील, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, मुख्याधिकारी दिनेश सिनारे, पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत,

लेवा पाटील गुजर समाजाचे जेष्ठ नेते सुभाष पाटील, माजी नगराध्यक्ष श्रीमती कांताबेन पाटील, श्रीमती प्रीती पाटील, माजी नगराध्यक्ष विजय पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुनील पाटील, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन राजाराम पाटील,

माजी चेअरमन विजय विठ्ठल पाटील, खरेदी विक्री संघाचे व्हा.चेअरमन जगदीश पाटील, राष्ट्र सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष प्रा.आर.टी.पाटील, शहादा जायट्स ग्रुप अध्यक्ष सतीश जव्हेरी, उद्योजक विनय गांधी, डॉ.योगेश चौधरी, नागरीहित संघर्ष समितीचे यशवंत चौधरी,

रमाशंकर माळी, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस जितेंद्र जमदाळे, शहराध्यक्ष विनोद जैन, पंकज सोनार, माजी नगरसेवक राकेश पाटील, सुनील पाटील यासह राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक, समाज बांधव, विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रथम गांधी चौकात मुलींच्या लेझीम पथकाने भारताच्या नकाशा लेझीमचे नृत्य करत साकारला होता. एकता रॅलीत वेगवेगळे सजीव देखावे सादर करण्यात आले होते.

त्यात शिव शंकर, भोलेनाथ व पार्वती, राम, सीता व लक्ष्मण, अग्रभागी हातात तिरंगा घेतलेली भारत माता, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याची प्रतिकृती व मलोनी, म्हसावद येथील भजनी मंडळ यांच्या समावेश होता.रॅलीच्या सुरुवातीला महिलांनी ११५ मीटर लांबीच्या तिरंगा हातात धरलेला होता.

रॅलीच्या मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या काढलेल्या होत्या. पुष्पवृष्टीदेखील करण्यात आली. नगरपालिकेतर्फे जुना प्रकाशा रस्त्याचे दुतर्फा रंगकाम करून सुशोभित करण्यात आले होते. मिरवणुकीत साधारणतः शहादा शहर व तालुक्यासह जिल्ह्यातील अडीच ते तीन हजार समाज बांधव सहभागी झाले होते.

एकता रॅली महात्मा गांधी चौक, गुजर गल्ली, जुना प्रकाशा रस्ता, नगरपालिका, जुने तहसील कार्यालय, बसस्थानक, दोंडाईचा रस्ता, स्टेट बँकेला वळसा घालून मेन रोड, जामा मशीद चौक, तूपबाजार, हुतात्मा लालदास चौक मार्गे कुकडेलमधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याजवळ अभिवादन करून एकता रॅलीच्या समारोप करण्यात आला.

दरम्यान महात्मा ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, स्वातंत्र्य सैनिकांची मुद्रा असलेले स्मारक, शहिद लालदास यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

विशेष म्हणजे एकता रॅलीत समाज बांधवांनी तसेच सरदार पटेल युवा फाउंडेशनच्या सदस्यांनी पांढरा पोशाख व टोप्या परिधान केल्या होत्या. महिलांनी एकाच रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या.

विविध सेवाभावी संघटनांनी नागरिकांनी थंड पाणी तसेच शरबतची सुविधा उपलब्ध केली होती. एकता रॅलीच्या शुभारंभ सकाळी १० वाजता करण्यात आला. पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com