नंदूरबारला शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला भव्य मोटर सायकल रॅली

नंदूरबारला शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला भव्य मोटर सायकल रॅली

नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी

शिवछत्रपती शिवाजी महाराज (Shivchhatrapati Shivaji Maharaj) यांची तिथीनुसार 21 मार्च रोजी साजरा होणार्‍या शिवजयंतीनिमित्त (Shiv Jayanti) नंदुरबार शहरात आज पूर्वसंध्येला शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने जल्लोषात मोटर सायकल रॅली (motor cycle rally) काढण्यात आली. या रॅलीत शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने मिरवणूक मार्ग शिवप्रेमींनी गजबजला होता.

छत्रपती शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने नंदुरबार शहरातील ग्यारामील कंपाऊंडपासून रविवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पूर्वसंध्येला मोटर सायकल रॅली काढण्यात आली. गिरीविहार गेट मार्गे सिंधी कॉलनी, करण चौफुली, कोरीट नाका पुन्हा गिरिविहार गेट मार्गे उड्डाणपूल, गांधी पुतळा, महाराष्ट्र व्यायाम शाळा, सोनार खुंट, टिळक रोड, जळका बाजार, शिवाजी चौक, देसाईपुरा, दादा गणपती मोठा मारुती मंदिर मार्गे छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात येऊन पोहोचली.या मोटर सायकल रॅली शिवप्रेमी मध्ये मोठा उत्साह दिसून आला. छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर या ठिकाणी रॅलीच्या समारोपावेळी रयतेचा राजा शिवछत्रपती यांच्या अश्वारूढ पुतळ्यावर केलेली आकर्षक विद्युत रोषणाई व प्रतिमापूजन कार्यक्रमाने रॅलीची सांगता झाली. यावेळी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या वतीने मिरवणूक मार्गावर पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला.

शिवरायांचा पुतळा भोवती लेझर शो

हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाचा पूर्वसंध्येला शिवसेना जिल्हा प्रमुख डॉ.विक्रांत दिलीपराव मोरे यांच्या संकल्पनेतून भव्य लेझर शोचे आयोजन करण्यात आले होते. नाट्य मंदिर परिसरातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या भोवती आकर्षक रंगीबिरंगी लेझर किरणांचा विद्युत रोषणाई परिसर झळकला होता.रविवारी सायंकाळी नाट्य मंदिर परिसरातील शिवरायांच्या पुतळ्याच्या भोवती रंगीबिरंगी आकर्षक विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघाला होता. लेझर शो पाहण्यासाठी शहरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच गर्दी केली होती.

लेझर शो प्रसंगी शिव गीतांच्या तालावर अवघी तरुणाई बेधुंद होऊन कृत्य करतांना दिसून आली. यावेळी जिल्हाप्रमुख डॉ.विक्रम मोरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी ठेका धरला होता.फ जय भवानी, जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com