कलाल समाजाच्या प्रत्येक घरावर मुलीच्या नावाची पाटी

मुलींचा सन्मान होण्यासाठी समाजाचा स्तुत्य उपक्रम
कलाल समाजाच्या प्रत्येक घरावर मुलीच्या नावाची पाटी

मोदलपाडा, Modalpada ता.तळोदा । वार्ताहर -

मुलीचा सन्मान (daughter's honor) राखण्याची आपली परंपरा (Our tradition) आहे. मुलींनाही मानसन्मान मिळावा, मुली कुठल्याही क्षेत्रात आज मागे नाहीत. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या यशाचा झेंडा रोवला आहे. म्हणून त्यांचाही सन्मान व्हावा, या हेतूने कलाल समाजातील (Kalal community ) ज्यांच्या घरामध्ये मुलगी (Girl in the house) असेल त्या घराच्या दर्शनी भागावर (facade of the house) मुलीच्या नावाची पाटी (Girl's name plate) व आई वडिलांच्या नावाचे स्टिकर (Parents name sticker) लावण्याचा स्तुत्य उपक्रम (commendable undertaking) सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र कलाल यांनी हाती घेतला आहे. त्यामुळे आता कलाल समाजातील प्रत्येक घर हे मुलीच्या नावाने ओळखले जाणार आहे. या स्तुत्य उपक्रमाचे समाजामधून सर्वत्र कौतूक होत आहे.

‘माझी मुलगी माझा अभिमान’ या अभियानांतर्गत तळोदा तालुक्यातील कलाल समाजातील ज्या घरांमध्ये मुलगी असेल त्या घराच्या दर्शनी भागाला मुलीच्या नावाची पाटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिवसेंदिवस प्रत्येक समाजात मुलींची संख्या ही कमी होऊ लागली आहे. शासन आणि सामाजिक कार्यकर्ते हे सतत प्रबोधन मोहिमा राबवित असतात. लेक वाचवा, बेटी बचाव बेटी पढाव, अशा घोषणा सतत केल्या जात असतात. तरीदेखील समाजामध्ये मुलींना कमी लेखण्याचे अनेक प्रकार हे घडतच असतात.

मुलींच्या जन्माचे स्वागत हे मुलाच्या जन्माइतकेच झाले पाहिजे. घराच्या दर्शनी भागावर मुलींच्या नावाची पाटी लागल्याने या ओळखींमध्ये एक खास भर पडणार आहे. यामुळे मुलींच्या मनात हे घर माझे आहे. ही विश्वासाची भावना उभी राहणार आहे. केवळ पाटीवर नाव पुरेसे नाही तर ते घराच्या कागदपत्रांवर देखील यायला हवे.

सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र कलाल हे नेहमी समाजाभिमुख विविध उपक्रम नेहमी राबवत असतात. त्यांच्या या स्तुत्य अश्या उपक्रमाचे समाजातून व शहरातून कौतुक करण्यात येत आहे.

नवरात्रीच्या निमित्ताने स्त्रीला देण्यासाठी सर्वात मोलाची भेट म्हणजे तिचा सन्मान. सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र कलाल यांनी त्यांच्याकडून कलाल समाजातील गरबा नवयुवक मंडळातील सर्व मुली व महिलांना फेटे बांधले. प्रत्येक स्तरातील स्त्रीला असाच मान सन्मान व आदर दिला गेला तर तिचे मानवी हक्क तिला अनुभवता येईल अशी समाजव्यवस्था निर्माण होईल आणि हाच खरा स्रीशक्तीचा जागर असेल.

मुलगी आणि मुलाबाबत अनेक समाजामध्ये आजही भेदभाव केला जात असतो. म्हणून माझी मुलगी माझा अभिमान या अंतर्गत समाजातील ज्या लोकांच्या घरी मुलगी असेल त्यांच्या घराच्या दर्शनी भागावर मुलीचे नाव लागल्याने हे घर माझे आहे, आपल्याला देखील कुणाचातरी आधार आहे. ही भावना मुलींच्या मनात निर्माण होईल व हा उपक्रम सहाय्यककारी ठरेल व समाजातील नागरिकांची मुलींबाबत मानसिकता बदलण्यास बदलण्यात येईल.

- देवेंद्र कलाल सामाजिक कार्यकर्ते, तळोदा

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com