
शहादा । Shahada। ता.प्र.
पत्नीला (wife) गंभीर स्वरूपाचा आजार असून ती वेडी आहे, तिला फिट येते असे आरोप करून तिचा मानसिक व शारीरिक छळ करून क्रूर वागणूक (cruel treatment) दिल्याप्रकरणी धुळे पोलीस दलात कार्यरत असणार्या पोलीस शिपायाविरुद्ध (police constable) शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा शहरातील मुलब्रीज नगर येथे राहणारा प्रविण उत्तम निकम हा धुळे पोलीस दलात शिपाई पदावर कार्यरत आहे. त्याने लग्न होऊन दीड ते दोन महिन्याच्या कालावधीनंतर पत्नीला गंभीर स्वरूपाचा आजार आहे, ती वेडी आहे, तिला फिट येतात,तिला भविष्यात अपत्य होणार नाही, अशा प्रकारचा गैरसमज समाजामध्ये पसरविण्यास सुरुवात केली.
तसेच विविध कारणांनी प्रवीण निकम यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी वैशाली निकुंबे हिचा शारीरिक व मानसिक छळ करून क्रूर वागणूक दिली तसेच कोणताही वैद्यकीय अहवाल किंवा प्रमाणपत्र नसताना समाजात बदनामी केली.
या प्रकरणी पती पोलीस शिपाई प्रवीण उत्तम निकुंबे, सासरे उत्तम नारायण निकुंबे, सासू मंगल उत्तम निकुंबे, (सर्व रा. मुलब्रिज नगर,शहादा), देवाभाऊ साळवे, ताईबाई देवाभाऊ साळवे, शरद देवाभाऊ साळवे, मोना शरद साळवे (सर्व रा.उमर्दे खुर्द ता.जि.नंदुरबार) यांच्याविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार तारसिंग वळवी करत आहेत.