हाणामारी प्रकरणी 46 जणांवर गुन्हा

तळोदा येथे ट्रस्टच्या अंतर्गत वादातून दोन गटात झाली होती दंगल, परस्परविरोधी दिली फिर्याद
हाणामारी प्रकरणी 46 जणांवर गुन्हा

नंदुरबार ।Nandurbar। प्रतिनिधी

तळोदा येथील ट्रस्टच्या अंतर्गत वादातून (dispute within the trust) दोन गटात तुफान दंगल (Storm riots in two groups) झाली. प्रशासकीय इमारतीच्या आवारात दोन गट एकमेकांना भिडले.यावेळी झालेल्या मारामारीत दोन्ही गटातील 9 जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी दोन्ही गटांनी पोलीसात परस्परविरोधी फिर्याद (Conflicting complaints) दिली असून 46 जणांविरोधात गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिलेल्या माहितीनुसार, अदनात आरिफ शेख यांचे वडील आरिफ शेख नुरा, भाऊ आकिब शेख रऊफ हे जामा मशीद मुस्लिम कमिटीच्या वादासंदर्भात तळोदा पोलीस ठाण्यात घेण्यात आलेल्या बैठकीस उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर ते घरी परत जात होते.

यावेळी शेख शरीफ शेख सरदार, शेरखान अजीजखान पठाण, विक्की काल्या पिंजारी, इम्रान ईस्माईल मिस्तरी, साजीद सरदार उमराव, आबीद बेलदार, तन्वीर शेख शरीफ, हुसैन शोएब रजा बंगाली, राजू अकबर पिंजारी व इतर 10 ते 15 जणांनी मारहाण केली. यात आरिफ शेख नुरा, अदनान आरिफ शेख, आकिब शेख आरिफ, झहीर शेख रऊफ हे जखमी झाले. त्यांना शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी देण्यात आली.

याप्रकरणी शेख साजीद शेख सरदार यांच्या फिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात 21 जणांविरोधात भादंवि कलम 143,147,149,324,323,504,506 मुंबई पोलीस कायदा कलम 37 (1) (3) चे उल्लंघन 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अविनाश केदार करीत आहेत.

दुसर्‍या गटाकडून शेख साजीद शेख सरदार यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शेख आरिफ शेख नुरा, शेख हारून, शेख यासीर शेख अझहर शेख अकबर, शेख अकबर शेख हिदायत, शेख शाकीर शेख हारून, शेख यासीर शेख हारून, शेख आफ्रिद शेख हारून, शेख रऊफ शेख नुरा, शेख जाकीर शेख रऊफ, शेख जाबीर शेख रऊफ, शेख जहीर शेख रफ, शेख जुबेर शेख रऊफ, शेख जमीर शेख रऊफ, शेख शकुर शेख नुरा, शेख साजीद शेख शकूर, शेख जामीद शेख शकुर, शेख आकीब शेख आरिफ, शेख अताब शेख आरिफ, शेख अदनान शेख आरिफ, फरहाज खान सईदखान यांनी संगनमत करून मारहाण केली.

यात शेख रीफ शेख सरदार, शेख तन्वीर, शेख शरीफ, शेख तौफिक शेख शरीफ, शेरखान अजीजखान पठाण, शेख साजीद शेख सरदार हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी शेख साजीद शेख सरदार यांच्या फिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात 25 जणांविरोधात भादंवि कलम 143,147,149,324,323,504, 506 मुंबई पोलीस कायदा कलम 37 (1) (3) चे उल्लंघन 135 प्रमाणे गुन्हा दाखल कर ण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com