Accident टायर फुटल्याने महामार्गावर अपघात, महिलेचा जागीच मृत्यू, तीन जण जखमी

सावरट गावानजिकची घटना
Accident टायर फुटल्याने महामार्गावर अपघात, महिलेचा जागीच मृत्यू, तीन जण जखमी

नवापूर | श.प्र.- NAVAPUR

तालुक्यातील सावरट गावा लगत (National Highways) राष्ट्रीय महामार्गावर सुझुकी कंपनीची आर्टिगा कारचा (Artiga car) टायर फुटल्याने झालेल्या (accident) अपघातात महिला जागीच ठार झाली. तर तीन जण किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली.

जळगाव (jalgaon) जिल्हातील (chalisgaon) चाळीसगाव तालुक्यातील कुंझरहून येथून धार्मिक कार्यक्रम आटोपून (surat) सुरतकडे जात असताना सावरट गावाजवळ नॅशनल हायवे ६ वर वळणावर अचानक अर्टीगा कारचा पुढील टायर फुटल्याने गाडी अनियंत्रित होऊन दुभाजकावर आदळली.

या अपघातात सोनल शामराव पवार (वय ३२, रा.सुरत) या महिलेला डोक्याला जबर मार लागल्याने तीचा जागीच मृत्यू झाला. सोबत असलेले चुलत भाऊ दिलीप शिवाजी चित्ते (वय ४२ रा.कुंझर), मुलगा रोहित शामराव पवार (वय ९), चालक हरिलाल लखनभाई पटेल (वय ५६, रा.पलसाना) आदी किरकोळ जखमी झाले आहेत. आज शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास हा अपघात झाला.

चाळीसगाव तालुक्यातील कुंझर येथे धार्मिक कार्यक्रमाला हे सर्वजण गेले होते. तेथून परततांना हा अपघात झाला. यात आईचा जागीच मृत्यू झाल्याने नऊ वर्षीय मुलाने आक्रोश केला. माझ्या आईला काय झाले, ती बोलत का नाही, आम्हाला सुरतला जायचे आहे,

मला माझा बाबाकडे पोहोचवून द्या, असा आक्रोश त्याने केला नवापूर (police) पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर व त्यांचे पथक १०८ रुग्णवाहिकेसह घटना स्थळी दाखल झाले. जखमीना नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून पोलीस उपनिरीक्षक अशोक मोकळं, प्रविण कोळी, पोहेकॉ विकास पाटील, अलताफ शेख पुढील तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com