Shoking # टाकरखेडा येथे तापीपात्रात एक मुलगा बेपत्ता

तिघांना वाचविण्यात यश, रात्री उशिरापर्यंत शोध सुरू
बेपत्ता रोहित पानपाटील
बेपत्ता रोहित पानपाटील

सारंगखेडा,Sarangkheda ता.शहादा| वार्ताहर

शिंदखेडा तालुक्यातील टाकरखेडा (Takarkheda)येथील चार शाळकरी मुले तापी नदीच्या पात्रात (Tapipatra) पोहण्यासाठी (swim) गेली. त्यांना पाण्यातील खड्ड्याचा अंदाज न आल्याने बुडू लागली. मात्र तिथे उपस्थित मच्छिमार व नागरिकांनी उपस्थितीताच्या मदतीने तीन मुलांना वाचविण्यात यश (Succeeded in saving three children) आले आहे . मात्र यातील एक मुलगा बेपत्ता (boy is missing) असल्याने त्याचा रात्री उशिरापर्यंत शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.

याबाबत अधिक माहितीनुसार, आज दि ३१ रोजी गणेशोत्सवानिमित्त शाळेला सुट्टी असल्यामुळे टाकरखेडा (ता. शिंदखेडा ) येथील चौघे शाळकरी मित्र तापी नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेले होते. मात्र जास्त पाण्यामुळे पाण्यातील खड्याचा चौघांना अंदाज न आल्याने त्यांचा तोल जावून ते बुडू लागले होते.

मात्र, नदीपात्रात असलेल्या मच्छिमार व अंघोळ करणाऱ्या नागरिकांचे लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ पाण्यात उडया टाकून तीन मुलांना बाहेर काढले. मात्र पाण्याचा प्रवाहात तीन पैकी एक मुलगा वाहून गेला. त्याचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता.

साहिल कृष्णा पानपाटील ( वय १५ ), कुणाल किशोर कापुरे ( वय १२) लकी नरेंद्र पानपाटील ( वय १० ) या तिघांना वाचण्यात यश आले आहे. मात्र, रोहित अमृत पानपाटील ( वय १४ ) हा बेपत्ता आहे. रात्री उशिरापर्यंत पट्टीच्या पोहणाऱ्याच्या मदतीने शोधकार्य सुरू होते. एकीकडे गणेशोत्सवाची सर्वत्र धूम सुरू असतांना मात्र याची वार्ता गावात व मुलांच्या घरी कळताच शोकाकुल वातावरण पसरले आहे. यावेळी येथील गंगाराम भिल, हिम्मत सोनवणे, व नागरिकांनी मदतकार्य केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com