सातपुडयाला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी झटतोय ७० वर्षीय तरुण

स्वखर्चाने केली २५ हजार वृक्षांची लागवड, असली परिसर झाला हिरवागार
सातपुडयाला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी झटतोय ७० वर्षीय तरुण

मोलगी | रविंद्र वळवी MOLAGI

बोडका झालेल्या सातपुड्याला (Satpuda) गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी अतिदुर्गम भागातील बिलाड्या जुगला वळवी (वय ७०, रा.असली (महूपाडा) ता.अक्राणी) यांनी गेल्या वीस वर्षात दुर्दम्य इच्छाशक्ती व अथक परिश्रमांच्या जोरावर जवळपास सतरा हजार रोपांचे संवर्धन (Conservation of seventeen thousand seedlings) करीत असलीचा (Asli) परिसर हिरवागार (Greenery) केला आहे.

सातपुडा पर्वताच्या परिसरात पूर्वी विपुल प्रमाणात वनसंपदा (Forest resources) होती. मात्र कालांतराने ती नष्ट झाली. सातपुड्याच्या परिसर पुन्हा एकदा हिरवागार(Greenery) होण्यासाठी शासकीय यंत्रणा, सामाजिक संघटना काम करीत आहेत.

असाच एक प्रयत्न बिलाड्या जुगला वळवी (वय ७०) रा. असली (महूपाडा) ता. अक्राणी या वृद्धाने (old man ) चालविला आहे. सातपुड्यातील इतर भागांप्रमाणेच असलीचा परिसरदेखील बोडका झाला. नष्ट झालेली वनसंपदा पुन्हा नव्याने प्राप्त करण्याचा चंग बिलाड्या बाबांनी मनाशी बांधला.

त्यासाठी त्यांनी असली येथील वनविभागाच्या (Forest Department) अख्यत्यारित येणार्‍या सुमारे ६० एकर जागेवर गेल्या वीस वर्षांत २ हजार आंबे, ४ हजार सागवान, ५ हजार बांबू आणि चारोळी, महू, आवळा अश्या इतर जातींची १४ हजार अशी एकूण २५ हजारांहून अधिक रोप स्वखर्चाने लावलीत.

बिलाड्या बाबांनी त्याचपरिसरात एका झोपडीत राहत, लावलेल्या रोपांचे (seedlings) संवर्धन केले. प्रसंगी त्यांना साप व इतर हिंस्त्रप्राण्यांना तोंड द्यावे लागले. मात्र न डगमगता त्यांनी त्यांचे काम सुरूच ठेवले.

बिलाड्या बाबांनी रोप तर लावले मात्र पाण्याची सोय नसल्याने, रोपांना पाणी कसे द्यायचे हा यक्षप्रश्न त्यांच्यापुढे होता. हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी माथा असलीच्या दुसर्‍या घाटातून स्वतः चारी खोदून त्याद्वारे पाणी उपलब्ध (Water available) केले.

वेळप्रसंगी डोक्यावर पाणी वाहत रोपांना पाणी दिले. एकीकडे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असतांना बिलाड्या बाबांनी अथक परिश्रम घेत असंख्य अडचणींना तोंड देत लावलेल्या रोपांचे संवर्धन (Conservation) केले.

त्यांना बाहेरगावी नोकरीला असलेला मुलगा विजय वळवी यांची साथ लाभली असून विजय वळवी त्यांना दरवर्षी हजारोंच्या संख्येने विविध जातींची रोप आणून देतात. त्यामुळे जवळपास १७ हजार वृक्ष त्याठिकाणी असून सदर परिसर हिरवागार (Greenery) झाला आहे.

ज्याठिकाणी बिलाड्या बाबांनी रोप लावत त्यांचे संवर्धन केले आहे ती जमीन वनविभागाची आहे. पर्यावरण संवर्धन (Environmental conservation) ही काळाची गरज असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी असे प्रामाणिक प्रयत्न करणार्‍या बिलाड्या बाबांना मानवी दृष्टिकोनातून व त्यांच्या सद्भावनेचा विचार करून संबंधित विभागाने त्यांच्या कार्यास प्रोत्साहन द्यायला हवे अशी अपेक्षा त्यांच्या कुटुंबीयांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

स्वतः त्याठिकाणी जात बिलाड्या वळवी यांचे काम पाहिले. वृक्षतोड (Deforestation) एवढया मोठ्या प्रमाणावर झाली आहे की एकटा वनविभाग अपुरा पडतोय. मात्र बिलाड्या बाबांमुळे आज त्याठिकाणचा परिसर पूर्णतः हिरवागार झाला आहे. त्यांचे कार्य कौतुकास्पद असून त्यांच्या कार्यास सलाम.

- सुभाष पाडवी, रा. सिसा.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com