गुन्हयातील ८६ लाखांचा मुद्देमाल मुळ फिर्यादीस परत

नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे उपक्रम स्तुत्य ः राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक श्री.कारगावकर यांचे प्रतिपादन
गुन्हयातील ८६  लाखांचा मुद्देमाल मुळ फिर्यादीस परत

नंदुरबार | NANDURBAR | प्रतिनिधी

नंदुरबार जिल्ह्यात दाखल असलेले मालमत्तेविरुध्द्चे गंभीर (Serious offenses against property) गुन्हे उघडकीस (exposing) आणून गुन्ह्यातील हस्तगत (Seized items) मुद्देमालापैकी ८६ लाख २३ हजार १३५ रुपये किमंतीच्या २४ गुन्ह्यातील मुद्देमाल तसेच ९ लाख ५५ हजाराचे शंभर मोबाईल (Mobile) राज्याचे अपर पोलीस महासंचालक विनय कारगांवकर (State Additional Director General of Police Vinay Kargaonkar) यांच्या हस्ते मुळ फिर्यादीस परत (Back to the original plaintiff) करण्यात आला. दरम्यान, चोरीस गेलेला मुद्देमाल मुळ फिर्यादीस विनाविलंब परत करण्याचा नंदुरबार पोलीस दलाचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. असे कार्यक्रम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील राबवावे त्यामुळे जनतेमध्ये पोलीस दलाबद्दल विश्वास वाढण्यास मदत होईल, असे प्रतिपादन श्री.कारगांवकर यांनी केले.

महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक विनय कारगांवकर हे दि.१७ ते १९ ऑक्टोबरदरम्यान नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी नंदुरबार दौर्‍यावर आले आहेत. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी श्री.कारगावकर बोलत होते.

अपर पोलीस महासंचालक विनय कारगांवकर यांच्या हस्ते नंदुरबार शहर पोलीस ठाण्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. रक्तदान शिबीरात नंदुरबार शहरातील विविध सामाजिक संघटना, पोलीस मित्र तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग नोंदविला. सदर रक्तदान शिबीरात एकुण १०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

त्यानंतर नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे पोलीस अधिकारी, अंमलदार व त्यांच्या कुटूंबीयांसाठी उभारण्यात आलेल्या वाचनालयाचे उद्घाटन करुन नंदुरबार पोलीस दल हे पोलीसांसाठी व पोलीस पाल्यांसाठी करीत असलेल्या चांगल्या उपक्रमांचे कौतुक केले.

पोलीस ठाणे आवारातच आधुनिक वाचनालय सुरु केल्याने नंदुरबार शहर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अमंलदारासोबत त्यांच्या कुटुंबीयांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्हयातून चोरीला गेलेले मोबाईल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने हस्तगत केले होते. सुमारे ९ लाख ५५ हजार रुपये किमंतीचे १०० मोबाईल अपर पोलीस महासंचालक विनय कारगांवकर यांच्या हस्ते मुळ तक्रारदारांपैकी २५ तक्रारदारांना प्रातिनिधीक स्वरुपात परत करण्यात आले.

हरविलेल्या मोबाईलचा शोध घेवून ते प्राप्त करून मुळ तक्रारदारांना परत करण्याच्या कामगिरीत नंदुरबार जिल्हा अग्रेसर राहिला आहे. चोरीस गेलेली मालमत्ता व हरविलेले मोबाईल परत मिळाल्याने उपस्थितांमध्ये समाधान व्यक्त झाले.

नंदुरबार जिल्ह्यात दाखल असलेले मालमत्तेविरुध्द्चे गंभीर गुन्हे उघडकीस आणून गुन्ह्यातील हस्तगत मुद्देमालापैकी ८६ लाख २३ हजार १३५ रुपये किमंतीचा २४ गुन्ह्यातील मुद्देमाल श्री. कारगांवकर यांच्या हस्ते परत करण्यात आला.

एखादी दुर्घटना किंवा अपघात होतो त्यावेळेस अत्याधिक रक्तस्त्राव झाल्यामुळे त्या व्यक्तीला रक्ताची आवश्यकता असते, परंतु जागरुकतेच्या अभावामुळे कुणीही अपघातग्रस्त इसमाला किंवा गरजु व्यक्तीला रक्तदान करीत नाही परंतु रक्तदान केल्यामुळे कोणाचा जीव वाचत असेल तर निश्चितच रक्तदान करायला हवे.

रक्तदान हे खरे जीवनदान असून नियमित रक्तदान केल्याने नवीन रक्त निर्मिती होते जे निरोगी शरीरासाठी फायदेशीर असते. तसेच सर्वसामान्य नागरिकांचा चोरी झालेला मुद्देमाल तसेच हरविलेले किंवा गहाळ झालेले मोबाईल त्यांच्या मनाशी निगडीत असतात.

त्यामुळे चोरीस गेलेला मुद्देमाल मुळ फिर्यादीस विनाविलंब परत करण्याचा नंदुरबार पोलीस दलाचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. तसेच असे मुद्देमाल परत करण्याचे कार्यक्रम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील राबवावे त्यामुळे जनतेमध्ये पोलीस दलाबद्दल विश्वास वाढण्यास मदत होईल असे प्रतिपादन श्री.कारगांवकर यांनी मनोगतामध्ये व्यक्त केले.

यावेळी श्री.कारगांवकर, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, उपअधीक्षक सचिन हिरे, संभाजी सावंत, स्थानिक गुन्हे शोखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com