चक्क शिरपूर-सुरत बसमध्ये आढळला ८० हजाराचा सुका गांजा

चक्क शिरपूर-सुरत बसमध्ये आढळला ८० हजाराचा सुका गांजा

पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

नवापूर | श.प्र.-NANDURBAR

शिरपूर-सुरत बस (Shirpur-Surat bus)मध्ये सुमारे ८० हजार रुपये किमतीचा ८ किलो सुका गांजाची (dry cannabis) बॅग आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सदर बॅग नवापूर बसस्थानकात जमा करण्यात आल्यानंतर पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आली. याबाबत अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.

शिरपूर-सुरत बसमध्ये नंदुरबार-नवापूर दरम्यान गांजाची बॅग (cannabis) आसनाखाली आढळून आली. सदर बॅग वाहकाने नवापूर बस स्थानकावर वाहतूक निरीक्षक सचिन पाटील यांच्याकडे सुपूर्द केली. बसमधील प्रवाश्यांना दुसर्‍या बसने रवाना करण्यात आले.

सदर घटनेची माहिती आगार प्रमुख राजेंद्र अहिरे यांना दिली. त्यानंतर नवापूर आगार प्रमुखांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. पंचनामा केला. त्या बॅगमध्ये ८० हजार रुपये किमतीचा आठ किलो वजनाचा सुका गांजा आढळून आल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश वाघ यांनी दिली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या पथकाने सदर गांजा (cannabis) जप्त केला आहे. कारवाईदरम्यान बसस्थानकावर मोठी गर्दी झाली होती.बसमध्ये अशा पद्धतीने गांजा तस्करी सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गांजा तस्करीचे आंतरराज्य रॅकेट तर नाही ना असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत पोलिस कसून चौकशी करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com