पोलिसांत गुन्हा दाखल होवू नये यासाठी ८ हजाराची लाच

पोलिसाला अटक
पोलिसांत गुन्हा दाखल होवू नये यासाठी ८ हजाराची लाच

नंदुरबार | प्रतिनिधी - Nandurbar

तक्रारदार व इतरांमध्ये झालेल्या मारहाण व वादाच्या प्रकरणात गुन्हा दाखल होवू नये यासाठी ८ हजाराची लाच (Bribe) स्वीकारणाऱ्या पोलिसाला रंगेहाथ अटक करण्यात आली

याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार व इतर लोकांमध्ये झालेल्या मारहाण व वादाच्या प्रकरणात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होवू न देण्याच्या बदल्यात विसरवाडी ता. नवापूर येथे कार्यरत असलेला पोलिस शिपाई दारासिंग जोरदार पावरा (३५) याने तक्रारदाराकडून १० हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती ८ हजार रुपये देण्याचे ठरले. सदर ८ हजाराची लाच पंच साक्षीदारांसमक्ष स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. याबाबत विसरवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस उप अधीक्षक राकेश चौधरी, सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक माधवी वाघ, हवालदार विलास पाटील, ज्योती पाटील, पोना मनोज अहिरे, अमोल मराठे यांच्या पथकाने केली.

दरम्यान, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ

अँन्टी करप्शन ब्युरो नंदुरबार (दुरध्वनी क्रं. ०२५६४-२३०००९) किंवा टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com