तोरणमाळ घाटात क्रुझर दरीत कोसळल्याने ८ ठार

मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
तोरणमाळ घाटात क्रुझर दरीत कोसळल्याने ८ ठार

नंदुरबार| प्रतिनिधी nandurbar


तोरणमाळ रस्त्यावरील सिंदीदिगर घाटात क्रुझर गाडीचा आज सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास अपघात झाला. यात ८ जण ठार झाल्याचे प्राथमिक अंदाज आहेत. या अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

तोरणमाळ रस्त्यावरील सिंदीदिगर घाटात आज दि.१८ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास क्रुझर गाडी दरीत कोसळली. या अपघातात आठ जण ठार झाल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हे प्रवासी मध्यप्रदेश येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.

या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर म्हसावद पोलीस घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी सोबत म्हसावद ग्रामीण रूग्णालयातील डॉक्टरांनाही सोबत नेले. हि माहिती मिळाल्यानंतर नंदुरबारचे पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत हि घटनास्थळी रवाना झाले.

ज्याठिकाणी अपघात झाला. त्या ठिकाणाचे फोटो सोशल मिडीयामध्ये व्हायरल झाले. हा अपघात घाटात त्याच ठिकाणी मागेही मोठा अपघात झाला होता. हे प्रवासी नेमके कोण आहे. याबाबत कळू शकले नाही. अपघात स्थळी कुठलीही मोबाईलची रेंज नसल्याने माहिती कळू शकली नाही.

या गाडीत ३० प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस प्रशासन स्थानिकांच्या याठिकाणी बचावकार्य करत आहे. जखमींना म्हसावद, तोरणमाळ या ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले आहे. मात्र प्रशासनाने अद्यापही कुठल्याही गोष्टीला दुजोरा दिला नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com