धडगांव नगरपंचायतीसाठी 79.84 टक्के मतदान

मतदान प्रक्रिया शांततेत, शहरात अनुचित प्रकार नाही, मतदानात महिलांची आघाडी, 19 जानेवारी रोजी मतमोजणी
धडगांव नगरपंचायतीसाठी 79.84 टक्के मतदान

नंदुरबार । Nandurbar। प्रतिनिधी

धडगाव (Dhadgaon) वडफळ्या रोषमाळ बु. नगरपंचायतिच्या (Nagar Panchayat) 17 जागांसाठी 79. 84 टक्के मतदान (Voting) झाले.यावेळी 3 हजार पुरुषांनी तर 3 हजार 6 महिला अशा एकुन 6 हजार 6 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.

धडगाव वडफळ्या रोषमाळ बु. नगरपंचायतिच्या 17 जागांसाठी आज मतदान घेण्यात आले. नगरपंचायतिच्या मतदानासाठी सतरा मतदान केंद्र नियुक्त करण्यात आली होती.सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.या निवडणुकीत 48 उमेदवार आपलें नशीब आजमावत आहे. मतदान प्रक्रियेत नगरपंचायतिच्या 17 वार्डातील एकूण 7 हजार 523 मतदार होते.यात पुरुष मतदार 3 हजार 711 व स्त्री मतदार 3 हजार 712 होते. आज सकाळी 7.30 वाजेपासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली.सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 14.94 टक्के मतदान झाले होते.तर 11.30 वाजेपर्यंत 37.87 टक्के मतदान झाले होते.दुपारी 1. 30 वाजेपर्यंत 60. 42 टक्के तर 3.30 वाजेपर्यंत तब्बल 74.58 टक्के मतदान झाले.

धडगाव नगरपंचायतीसाठी एकूण 79. 84 टक्के मतदान झाले.यात 3 हजार पुरुषांनी तर 3 हजार 6 महिला अशा एकुन 6 हजार 6 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

धडगांव नगरपंचायतीसाठी 17 मतदान पथक नियुक्त करण्यात आले होते, तसेच 8 मतदान पथक राखीव ठेवण्यात आले होते. या प्रक्रियेत 17 मतदान केंद्रावर एकूण 102 मतदान कर्मचारी व प्रत्येक केंद्रावर एक पोलीस कर्मचारी याप्रमाणे एकूण 17 पोलीस कर्मचारी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आले होते. या निवडणुकीसाठी तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला.यात 1 उपविभागीय पोलीस अधिकारी, 2 पोलीस निरीक्षक,6 एपिआय व पीएसआय, 62 पुरुष पोलीस कर्मचारी, 12 महिला पोलीस कर्मचारी, 56 पुरुष होमगार्ड तर 19 महिला होमगार्डचा समावेश होता. दरम्यान धडगांव येथील नगरपंचायतीच्या 17 जागांसाठी शांततेत मतदान पार पडले. शहरात सर्वत्र शांतता असून कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनंत जवादवार,निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. चेतन गिरासे, तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.