एक्स्ट्रॉ बॅकअपची चावी मिळवून एटीएममधून ६२ लाखांची रोकड चोरी

नंदुरबारातील कंपनी कर्मचार्‍याविरुद्ध गुन्हा
एक्स्ट्रॉ बॅकअपची चावी मिळवून एटीएममधून ६२ लाखांची रोकड चोरी

नंदुरबार | प्रतिनिधी - NANDURBAR

सीएमएस इन्फोसिस्टीम एलईटी या कंपनीच्या कर्मचार्‍याला कंपनीकडून कोणत्याही प्रकारच्या एटीएममध्ये (ATM) पैसे भरण्याचे आदेश नसतांना त्याने कंपनीकडून एक्स्ट्रॉ बॅकअप (extra backup key) चावी मिळवून नंदुरबार शहर तसेच नवापूर व रायंगण येथील एटीएममधून ६१ लाख ९१ हजार ५०० रुपयांची रोकड चोरी (cash stolen) केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील भाट गल्ली परिसरात राहणारा पंकज किशोर चौधरी हा सीएमएस इन्फोसिस्टीम एलईटी या कंपनीचा कर्मचारी आहे. त्याला कंपनीकडून कोणत्याही प्रकारच्या एटीएममध्ये पैसे भरण्याचे आदेश नसतांना

त्याने कंपनीकडून एक्स्ट्रॉ बॅकअप चावी मिळवून सदर चावीचा गैरउपयोग करुन वेळोवेळी शहरातील तसेच नवापूर व रायंगण येथील एटीएममधून ६१ लाख ९१ हजार ५०० रुपयांची चोरी केली. दि.५ ते २३ डिसेंबरदरम्यान त्याने मिराज सिनेमाजवळ असलेल्या एसबीआयच्या एटीएममधून १६ लाख,

सिंधी कॉलनीतील एसबीआयच्या एटीएममधून २१ लाख ९९ हजार ५००, रायंगण ता.नवापूर येथील एसबीआय एटीएममधून ५ लाख रुपये, नवापूर येथील युनीयन बँक आँफ इंडीयाच्या एटीएममधून ९ लाख ९२ हजार अशा एकुण ६२ लाख ९१ हजार ५०० रुपयांची रोकड चोरी केली.

याप्रकरणी राहूल प्रभाकर मानकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पंकज किशोर चौधरी याच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४०९, ३७९, ३८१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर करीत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com