नंदुरबारात आजपासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ५६ वे प्रदेश अधिवेशन

सायंकाळी ध्वजारोहणाने होणार प्रदर्शनी उद्घाटन, सिनेअभिनेता योगेश सोमण यांची उपस्थिती
नंदुरबारात आजपासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ५६ वे प्रदेश अधिवेशन

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (Akhil Bharatiya Vidyarthi Parishad) महाराष्ट्र प्रदेशाचे (Maharashtra Pradesh) ५६ वे प्रदेश अधिवेशन (State Convention) उद्या दि.११ ते १३ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत नंदुरबारात आयोजीत (Organized) करण्यात आले आहे. या अधिवेशनात शिक्षण क्षेत्रात झालेले बदल, सामाजिक प्रश्‍न तसेच शिक्षणासोबतच विविध क्षेत्रात झालेल्या भ्रष्टाचाराबाबतचे (About corruption) प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याची माहिती अभाविपचे प्रदेश मंत्री (State Minister) सिद्धेश्‍वर लटपटे (Siddheshwar Latpatte) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

श्री.लटपटे म्हणाले, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ५६ वे प्रदेश अधिवेशन नंदुरबारातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात(Chhatrapati Shivaji Maharaj Natyagriha) आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाचे प्रदर्शनी उद्घाटन (Inauguration) उद्या दि. ११ फेब्रुवारी रोजी वाजता करण्यात येणार आहे.

सायंकाळी ५ वाजता ध्वजारोहण (Flag hoisting) करण्यात येणार आहे. अधिवेशनाचे उद्घाटन जनजातीय राष्ट्रीय (Tribal National) अध्यक्ष (President) हर्ष चौहान (Harsh Chauhan) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रसिद्ध अभिनेते योगेश सोमण (Actor Yogesh Soman), अभाविपचे राष्ट्रीय संघटनमंत्री (National Union Minister) आशिष चौहान (Ashish Chauhan) उपस्थितीत राहणार आहेत.

या अधिवेशनामध्ये सामाजिक आणि शिक्षण (education) क्षेत्रातील गैरकारभारावर (Malpractice) ‘आसुड’ या विषयांवर प्रस्ताव पारित केले जाणार आहेत. प्रास्ताविक सत्रामध्ये प्रदेशमंत्री मंत्री प्रतिवेदनामध्ये अभाविपच्या मागील वर्षाच्या कार्याचे सिंहावलोकन करणार आहेत तसेच शैक्षणिक वर्ष २०२२- २३ साठी पश्चिम महाराष्ट्र (Western Maharashtra) व देवगिरी (Devagiri) या दोन प्रांताचे प्रदेश मंत्री आणि प्रदेश अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे.

प्रदेश अधिवेशनामध्ये दोन भाषण सत्र होतील, यात अभाविपचे राष्ट्रीय सह संघटनमंत्री प्रफुल्ल आकांत ‘जनजाती गौरव’ (Tribal Pride) या विषयावर व प्रा.डॉ. मनिष जोशी हे अभाविप कार्यविस्तार या विषयावर भाषण करतील.

नुकतेच राज्य शासनाने आणलेल्या सार्वजनिक विद्यापीठ कायदा दुरुस्ती विधेयकामुळे (University Law Amendment Bill) शिक्षण क्षेत्रावर काय परिणाम होतील विषयात परिसंवाद (Seminar) होणार आहे. यामध्ये शिक्षण क्षेत्रातील तज्ञ मंडळी आपले मत व्यक्त करतील.

महाराष्ट्रातील विविध भागाती छात्र नेत्यांच्या (Student leaders) उपस्थितीत जाहीर सभादेखील आयोजित केली जाणार आहे.अधिवेशनाच्या समारोपामध्ये अभाविपचे नवनिर्वाचित प्रदेश मंत्री (Newly elected state minister) अभाविपच्या कार्याची आगामी दिशा मांडणार आहेत.

तसेच यावेळी देवगिरी आणि पश्चिम महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष प्रदेश कार्यकारिणीची घोषणा करणार आहेत. त्यानंतर ध्वजावतरणाने (flag hoisting) या अधिवेशनाची सांगता (Concludes) होणार आहे. या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील २०० विद्यार्थी प्रतिनिधी (Student representative) या नंदुरबार नगरीमध्ये दाखल होणार आहेत.

यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे नंदुरबार शहरमंत्री जयेश सोनवणे, स्वागतसमिती अध्यक्ष सौ.इलाबाई गावित, स्वागत समिती सचिव प्रा.संतोष पाटील, व्यवस्थाप्रमुख प्रा.गिरीश पवार उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com