जिल्ह्यातील एसटीचे 516 कर्मचारी रूजू

जिल्ह्यातील एसटीचे 516 कर्मचारी रूजू

330 बसच्या फेर्‍या;प्रवाशांना दिलासा

नंदुरबार । Nandurbar। प्रतिनिधी

गेल्या सहा महिन्यापासून एसटीचे शासनात विलीकरण (Merger of ST into government) व्हावे, या मागणीसाठी कर्मचारी संपावर (staff strike) होते. दरम्यान न्यायालयाचा निकालानंतर (court's decision) एस.टी. कर्मचार्‍यांनी सेवेत रुजु होण्याचा निर्णय घेतला. आज नंदुरबार जिल्ह्यातील चार आगारातील 516 कर्मचारी कामावर हजर (At work) झाले असन एस.टी.चे चाके काहीशी गतिमान होवून जिल्हाभरात एस.टीच्या 330 फेर्‍या मारण्यात आल्या. प्रवासी सेवा पुन्हा एकदा सुरळीत होण्याचे चिन्ह असून येत्या एक ते दोन दिवसात जिल्ह्यातील एसटया पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे.

एस.टी.चे शासनात विलीकरण व्हावे, या मागणीसाठी गेल्या सहा महिन्यापासून कर्मचार्‍यांना लढा सुरू आहे. सदर मागणी पूर्ण होईपर्यंत बेमुदत संप (Indefinite strike) करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सहा महिन्यापासून एस.टी. कर्मचर्‍यांनी संप (S.T. Employees strike) केल्याने प्रवासी सेवा विस्कळीत झाली होती. या कालावधीमध्ये ग्रामीण भागातील रहिवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. मात्र न्यायालयाने (court's decision) दि.22 एप्रिलपर्यंत सर्व कर्मचर्‍यांना सेवेत रूजू होण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार लढा विलीकरण संघाची बैठक होवून आज नंदुरबार, नवापूर, शहादा व अक्कलकुवा या चार आगारातील कर्मचारी कामावर रूजू झाले. जिल्ह्यातील या चार आगारातील 1 हजार 476 कर्मचारी संपावर उतरले होते. दरम्यान आज पैकी 516 कर्मचारी कामावर रूजू झाले. यात नंदुरबार 292, शहादा 137, नवापूर 60, अक्कलकुवा 27 कर्मचार्‍यांनी आज आपआपले आगार गाठत कागदपत्र सादर केले. नंदुरबार आगारातून आज 100, शहादा आगारातून 160, नवापूर आगारातून 50 तर अक्कलकुवा आगारातून 20 फेर्‍या बसने मारल्या. दरम्यान जिल्ह्यातील ज्या कर्मचार्‍यांना नोटीसी बजावण्यात आल्या होत्या.त्यांनी विभागीय कार्यालयाकडे अपील सादर केली.

आज विविध आगारांमध्ये रूजू होण्यासाठी कर्मचार्‍यांनी एकच गर्दी केली होती. येत्या एक ते दोन दिवसात नंदुरबार जिल्ह्यातील बससेवा (Bus service) सुरळीत होईल. असे आगार प्रमुखांनी सांगितले.

Related Stories

No stories found.