मालदा वनक्षेत्रात 50 हजार वृक्षांची लागवड करणार

सहा.पोलीस निरीक्षक अमित बागुल यांच्या हस्ते वृक्षारोपण
मालदा वनक्षेत्रात 50 हजार वृक्षांची लागवड करणार

बोरद । वार्ताहर-

मालदा (Malda forest area )येथे वनविभागातर्फे 20 हेक्टर वनक्षेत्रात (forest area) 50 हजार वृक्षांची लागवड (Plantation of trees) करण्याची मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेचा शुभारंभ (Launch of the campaign) करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बागुल यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

महाराष्ट्र शासन मेवासी वनविभाग तळोदा अंतर्गत मालदा येथे भरीव वनीकरण कार्यक्रम अंतर्गत 20 हेक्टर वनक्षेत्रात 50 हजार वृक्ष लागवड करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. तळोदा येथील सहाय्यक पोलिस निरिक्षक अमीत बागुल यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी पोलिस उपनिरिक्षक प्रिया वसावे, सरपंच गोपी पावरा, पोलिस पाटील सखाराम ठाकरे, बोरद बीटचे हेकॉ गौतम बोराळे, पोलिस नाईक राजू जगताप, पो नाईक विजय विसावे, पोशि तुकाराम पावरा, पोशि शोटू कोळी, पोशि तुकाराम पावरा, पो रविंद्र पाडवी, पोलिस पाटील तालुका अध्यक्ष अशोक पाडवी परशुराम पाडवी आदी उपस्थीत होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com