आरटीओ कार्यालयामार्फत ४० कोटींची वसुली

गतवर्षाच्या तुलनेत महसुलात पावणे दोन कोटींनी वाढ
आरटीओ कार्यालयामार्फत ४० कोटींची वसुली
नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन कार्यालयNANDURBAR RTO OFFICE

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षांत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत (Sub-Regional Transport Office) वाहन कर (Vehicle tax), पर्यावरण कर, नोंदणी शुल्क, परवाना शुल्क, (License fee) तडजोड शुल्क आदीच्या माध्यमातून ३९ कोटी ६३ लक्ष एवढ्या रक्कमेची वसूली (Recovery of amount) करण्यात आली आहे. गतवर्षांच्या तुलनेत यावर्षी एकूण वसूलीमध्ये १ कोटी ६६ लक्ष रुपयांची वाढ झाली आहे, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी (Deputy Regional Transport Officer) किरण बिडकर (Kiran Bidkar) यांनी दिली.

मोटार वाहन कायद्यातील (Motor Vehicle Act) तरतुदीचे उल्लंघन करणार्‍या वाहनांची तपासणी करुन कारवाई करण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात एक वायुवेग पथक (Wind velocity squad) कार्यरत करण्यात आले होते.

या पथकाद्वारे सन २०२१-२०२२ या वर्षांत ओव्हर लोड वाहतूक, विना हेल्मेट, दुचाकी चालविणे, वाहन चालवितांना मोबाईलचा वापर करणे, वाहनांमध्ये अनधिकृत बदल करणे, यांत्रिकदृष्टया वाहन सुस्थितीत नसणे, वाहनाचा विमा नसणे आदी प्रकारचे गुन्हे (Crime) करणार्‍या २ हजार ३२५ वाहनांविरुध्द कारवाई करुन ३ कोटी ३८ लाख रुपये तडजोड शुल्क व करवसुली (Tax collection) करण्यात आली आहे.

दारु पिऊन वाहन चालविणे, वाहन चालवितांना मोबाईलचा वापर करणे, धोकादायकरित्या वाहन चालविणे, ओव्हरलोड वाहतूक करणे आदी गुन्ह्यांकरीता २१७ वाहनचालकांचे ड्रायव्हींग लायसन्स (Driving license) निलंबित करण्यात आले आहे.

महाराष्ट्र गुजरात सिमेवर (Maharashtra Gujarat border) असलेल्या नवापूर सिमा तपासणी नाका येथे या वर्षांत ३१ हजार ६२७ वाहनाविरुध्द कारवाई (Action against the vehicle) करुन ९ कोटी १८ लाख तसेच अक्कलकुवा सिमा तपासणी नाका येथे १० हजार ३२३ वाहनांकडून ३ कोटी ८८ लक्ष रुपयांची तडजोड शुल्क (Compromise charges) व करवसुली करण्यात आली आहे.

नंदुरबार जिल्ह्यात सन २०२१-२०२२ वर्षांत एकूण १२ हजार १७९ नवीन वाहनांची नोंद झाली आहे. त्यात ९ हजार १५८ दूचाकी, १ हजार १६५ कार/जीप, ६१ रुग्णवाहिका, १ हजार ३८५ ट्रॅक्टर, १४६ ट्रेलर, २२७ मालवाहू वाहने, २८ जेसीबी, ८ टॅक्सी, १ ऑटोरिक्षा व अन्य वाहने (vehicle) यांचा समावेश आहे.

ही महसूल वसूली करण्यासाठी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव, तसेच कार्यालयातील सर्व मोटार वाहन निरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षक तसेच कार्यालयीन कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले.

Related Stories

No stories found.