नंदूरबार जिल्ह्यात शनिवारी आढळले ३७ कोरोना रुग्ण

नंदूरबार जिल्ह्यात शनिवारी  आढळले ३७ कोरोना रुग्ण

नंदुरबार Nandurbar | प्रतिनिधी-

नंदुरबार जिल्हयात दि.८ जानेवारी रोजी तालुक्यात तब्बल 37 जणांचा (37 reported) अहवाल कोरोना पॉझिटीव्ह (corona positive)आला आहे. कालच नंदुरबार जिल्ह्यात १८ कोरोना रूग्ण आढळले होते.

नंदुरबार जिल्हयात आज दि.८ जानेवारी रोजी दिवसभरात 37 कोरोना पॉझिटीव्ह आढळले. यात नंदुरबार तालुक्यात 31, नवापूर तालुक्यात २, अक्कलकुवा तालुक्यात ३ तर शहादा तालुक्यातील एकाचा समावेश आहे. गेल्या १० दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यातील कोरोना रुग्ण सातत्याने वाढतांना दिसत आहे. सध्या नंदुरबार जिल्ह्यात सध्या ९० च्यावर कोरोना रुग्ण आहेत.सध्या नंदुरबार जिल्ह्याचा पॉझिटीव्ह रेट १४.८४, डेथ रेट २.३६, तर रिकवरी रेट ९७.४७ आहे.

नंदूरबार जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढू नये यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच लसीकरण करून घ्यावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com