नंदुरबार येथे 33 व्या नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धांना सुरुवात

नंदुरबार येथे 33 व्या नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धांना सुरुवात

नंदुरबार । Nandurbar। प्रतिनिधी

नंदुरबार येथे 33 व्या नाशिक परिक्षेत्रीय (33rd Nashik Regional) पोलीस क्रीडा स्पर्धांना (Police sports competitions) आजपासून सुरुवात (beginning) झाली. या स्पर्धा 4 नोव्हेंबरपर्यंत होणार आहेत.

पोलीस मुख्यालय नंदुरबार येथील मैदानावर 33 व्या नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेला आज दि.31 पासून सुरुवात झाली. सदर स्पर्धा दि. 4 नोव्हेंबर दरम्यान खेळविल्या जाणार आहेत. पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, उपअधीक्षक सचिन हिरे, विश्वास वळवी, आत्माराम प्रधान, श्रीकांत घुमरे, संभाजी सावंत यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व पोलीस खेळाडू उपस्थित होते.

जनतेची सुरक्षा हे पोलीसांचे कर्तव्य असून त्यासाठी पोलीस दिवसरात्र मेहनत करून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत असतात. परंतु रात्रगस्त, गुन्ह्याचे तपासकामी बाहेर गावी, बंदोबस्त, कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त इत्यादी अनेक कारणांमुळे पोलीसांचे वैयक्तीक आरोग्याकडे दूर्लक्ष होते त्यामुळे त्यांना विविध प्रकारच्या व्याधी होवून शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते.

पोलीसांनी जनतेच्या सुरक्षेसोबतच स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, त्यासाठी मैदानी खेळ खेळून आपली शरीरयष्टी उत्तम ठेवणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे मैदानी खेळ खेळल्यामुळे आपली शारीरिक स्थिती उत्तम राहाते व मानसिक ताण तणाव देखील दुर होतो, म्हणून पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी आपल्या दैनंदिन कामकाजातून मैदानी खेळांसाठी थोडा वेळ काढुन मैदानी खेळ खेळावे.

तसेच खेळामुळे सांघिक काम करण्याची वृत्तीत वाढ होते असे सांगून पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धांमध्ये जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धांमध्ये सांघिक व वैयक्तिक खेळातून प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंची निवड करण्यात येत असते. प्रत्येक खेळाडूंनी पंचांच्या निर्णयाला अंतीम निर्णय समजून खेळाडूवृत्ती दाखवावी.

तसेच परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेनंतर होणार्‍या आंतरविभागीय पोलीस क्रीडा स्पर्धा तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील प्रत्येक पोलीस खेळाडूंनी नाशिक परिक्षेत्राचे त्याच बरोबर महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव लौकीक करावे अशी अपेक्षा श्री. पाटील यांनी व्यक्त केली.

या स्पर्धेमध्ये नंदुरबार, धुळे, जळगांव, अहमदनगर, नाशिक (ग्रामीण), नाशिक शहर असे एकुण 6 संघ सहभागी झाले आहेत. सदर स्पर्धेदरम्यान सांघिक व वैयक्तिक खेळ, यामध्ये स्विमींग, कुस्ती, ज्युडो, बॉक्सींग, वेटलिफ्टींग, 100, 200, 400, 800 मीटर धावणे, फुटबॉल, हॉकी, व्हॉलीबॉल आदी क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. प्रत्येक संघामध्ये साधारणतः 90 खेळाडु असे एकुण 240 सांघिक व वैयक्तिक खेळाडु सहभाग घेणार आहेत. तसेच खेळाडूंमध्ये खिलाडूवृत्ती राहावी तसेच पोलीस दलाचा नावलौकिक राहावा याकरीता सर्व खेळाडूंनी शपथ घेतली.

सदर स्पर्धेची सांगता 4 नोव्हेंबर रोजी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी. शेखर पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये सांघिक ववैयक्तिक खेळातून प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंची आंतर विभागीय पोलीस क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात येत असते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com