नंदुरबार येथील वैद्यकीय महाविद्यालयात 333 पदे भरण्यात येणार

खा.डॉ.हिना गावीत यांच्या पाठपुराव्याला यश
नंदुरबार येथील वैद्यकीय महाविद्यालयात 333 पदे भरण्यात येणार

नंदुरबार । प्रतिनिधी Nandurbar

नंदुरबार येथील वैद्यकीय महाविद्यालयाची आवश्यक पदे निर्मितीबाबत महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने मान्यता दिली आहे. गुरूवारी हा निर्णय झाला आहे. त्यामुळे टप्या टप्याने 333 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे खर्‍या अर्थाने नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालयाच्या नियमित कामकाजाला चालना मिळणार आहे. पद भरतीसाठी खा.डॉ.हिना गावीत यांनी पाठपुरावा केला होता.त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

भारतीय आयुर्विमा परिषदेच्या मान्यतेच्या अधीन नंदुरबार येथे प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले आहेत. तेथील पद भरतीसाठी खा.डॉ.हिना गावीत यांनी पाठपुरावा केला होता. त्यानुसार हे आदेश काढण्यात आले. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानकांनुसार विविध सवर्गातील चार वर्षांसाठी 550 पदे निर्माण करण्यास तसेच पदनिर्मित्ी, यंत्रसामुग्री उपकरणे, आवती खर्च, बाहस्त्रोत खर्च व नव्याने आनुषंगिक शैक्षणिक रूग्णालय निर्मितीसाठी येणार्‍या खर्चास तसेच आवश्यकता भासल्यास पूरक मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे.

नंदुरबार येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी शासनाने 20 नोव्हेंबर 2020 अन्वये प्रथम वर्षासाठी वर्ग 1 ते वर्ग 3 ची नियमित 111 पदे निर्माण करण्याबाबत तसेच 54 काल्पनिक पदे बाह्यास्त्रोताने, कंत्राटी अशी एकूण 165 पदे निर्माण करण्यास मान्यता दिली आहे. उच्चस्तरीय समितीच्या मान्यतेची अट शिथील करून आवश्यक तेवढी पद निर्मिती करण्यास व पदे भरण्यास मान्यता दिली आहे. त्याच धर्तीवर शैक्षणिक वर्ष 2020-2021 पासून सुरू झालेल्या नंदुरबार शासकीय वैद्यकीय उच्चस्तरीय समितीच्या मान्यतेने पद निर्मिती केली आहे.

आता महाविद्यालय रूग्णालयासाठी उर्वरीत आवश्यक पदांची निर्मिती करण्यास व पदे भरण्यास देखील उच्चस्तरीय समितीच्या मान्यतेची अट शिथील करण्यास मान्यता दिली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानकानुसार वर्षनिहाय, आवश्यक पदनामनिहाय पदनिर्मिती आवश्यक असल्यामुळे संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांनी सादर केल्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार येथील द्वितीय व तृतीय व चतुर्थ वर्षासाठी पदनिर्मितीतीस व भरतीस मान्यता मिळाली.

Related Stories

No stories found.