संप करणारे जिल्हयातील २३ कर्मचारी निलंबीत

एसटी महामंडळाची कारवाई
संप करणारे जिल्हयातील २३ कर्मचारी निलंबीत

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचार्‍यांनी संप पुकारला आहे. या पार्श्‍वभुमीवर एसटी महामंडळाने जिल्हयातील २३ कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. यात नंदुरबार आगारातील ५, अक्कलकुवा आगारातील ७, नवापूर आरगारातील ५ तर शहादा आगारातील ६ कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरणासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचार्‍यांचा संप सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने समिती नेमण्याबाबत अधिसूचना काढूनही एसटी संघटनांनी संप मागे घेतला नाही.

म्हणून एसटी महामंडळाने आता कारवाईचे सत्र सुरु केले आहे. आज एस.टी. महामंडळाने जिल्हयातील चार आगारातील २३ कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. यात नंदुरबार आगारातील ५, अक्कलकुवा आगारातील ७, नवापूर आगारातील ५ तर शहादा आगारातील ६ कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

दरम्यान, एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान तर होत आहेच परंतू जीवजीवनही विस्कळीत झाले आहे. बससेवा बंद असल्यामुळे अनेकांना बाहेरगावी जाण्यायेण्यासाठी खाजगी वाहनांचा सहारा घ्यावा लागला.

खाजगी वाहतूकदार, टॅक्सी, रिक्षा चालकांनी या संधीचा फायदा घेत प्रवासी भाडयामध्ये मोठया प्रमाणावर वाढ केली आहे. त्यामुळे प्रवासीवर्ग संतप्त झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com