राष्ट्रीय लोकअदालतीत 2 कोटी 69 लाख दंड वसूल

433 प्रलंबित तर दाखलपूर्वक 1495 प्रकरणे निकाली
राष्ट्रीय लोकअदालतीत 2 कोटी 69 लाख दंड वसूल

नंदुरबार । Nandurbar । प्रतिनिधी

नंदुरबार जिल्ह्यात काल झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 433 प्रलंबित प्रकरणे तर दाखलपुर्वक 1495 प्रकरणे निकाली (Cases settled) काढण्यात आले. यात एकूण 2 कोटी 69 लाख 99 हजार 854 रूपये वसुल करण्यात आले.

राष्ट्रीयसेवा प्राधिकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र विधीसेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हाविधीसेवा प्राधिकरण व जिल्हा वकिल संघ नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय नंदुरबार व तालुकास्तरावर काल शनिवार रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये सर्व प्रकारचे दिवानी फौजदारी मोटार अपघात दावे कौटूंबिक हिंसाचार चलनक्षम दस्ताऐवज प्रकरणे यासह विविध प्रकरणे ठेवण्यात आली होती.

सदर लोकन्यायालयाचा प्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एस.तिवारी, जिल्हाविधीसेवा प्राधिकरणाचे सचिव डी.व्ही.हरणे यांच्या उपस्थितीत लोकअदालत घेण्यात आली. यावेळी तर्द्थ जिल्हा न्या.एक एस.एस.भागवत, न्या. वरिष्ठस्तर एस.टी.मलिये, मुख्य न्याय दंडाधिकारी व्ही.जी.चव्हाण, 2 रे सहदिवाणी न्या.एन.बी.पाटील यांनी पॅनलप्रमुख काम पाहिले. जिल्हाभरात झालेल्या राष्ट्रीयलोक अदालतीचे 17 प्रलंबित प्रकरणे निकाली निघाले. यात 11 लाख 31 हजार 846 मोटर अपघात प्रकरणे 15 यात 51 लाख 40 हजार चलनक्षम धनादेश प्रकरणी 29, 41 लाख 12 हजार 880, कौटूंबिक वाद प्रकरणी फौजदारी प्रकरणे 9 यात एक हजार रूपये, इतर किरकोळ फौजदारी 336 यात 11 हजार 366 रूपये, बँक थकबाकी वसुली 19 प्रकरणे यात 29 लाख 46 हजार 95 असा प्रलंबित प्रकरणांमध्ये 433 प्रकरणे निकाली निघाले. यात 1 कोटी 34 लाख 45 हजार 421 रूपये दंड वसुल करण्यात आला तर दाखलपुर्व प्रकरणांमध्ये 71 बँक वसुली यात 1 कोटी 14 लाख 63 हजार 289 रूपये, वीज थकबाकी वसुली 15 प्रकरणातून 1 लाख 57 हजार 233 रुपये, पाणीपट्टी घरपट्टी थकबाकी वसुलीचे 224 प्रकरणे यातून 8 लाख 13 हजार 76 रूपये, बीएसएनएलचे 12 प्रकरणातून 73 हजार 539 रूपये, 1162 ई ट्राफीक चलन प्रकरणात 1 लाख 37 हजार असा एकूण दाखलपुर्वक 1 हजार 495 प्रकरणे निकाली काढण्यात आले.

यात 1 कोटी 35 लाख 54 हजार 433 रूपयांचा दंड वसुल करण्यात आला. काल झालेल्या लोकअदालतीत प्रलंबित व दाखलपुर्वक 2928 प्रकरणे निकाली काढण्यात आले असून यात 2 कोटी 69 लाख 99 हजार 854 रूपये दंड वसुल करण्यात आला तसेच यावेळी विधी महाविद्यालयाचे प्राचार्य एन.डी.चौधरी, अ‍ॅड.यु.एच.केदार, श्रीमती एस.यु.खत्री, अविनाश पाटील, गणेश बैरागी, अ‍ॅड.दत्तात्रय कदमबांडे, श्रीमती विनया मोडक, आर.ए.मोरे, ए.बी.कढरे, पुष्पेंद्र पाटील, एन.एल.गिरासे, दिपाली रघुवंशी यांनी दाखलपुर्वक प्रकरणामध्ये पॅनल सदस्य म्हणून काम पाहिले. या लोकअदालतीच्या प्रसंगी नवनियुक्त न्यायीक अधिकारी ए.एस.बडगुजर, एस.बी.मोरे, ए.आर.कुलकर्णी, श्रीमती पी.एन.काजळे, आरती क्रिष्णा बनकर, एम.बी.पाटील, श्रीमती एस.आर. पाटील यांनी लोक न्यायालयाचे कामकाजाचे अवलोकन केले. राष्ट्रीय लोकअदालतीच्या यशस्वीतेसाठी जिल्हा व सत्र न्यायालय प्रबंधक एस.व्ही.जोशी, नंदुरबार वकिल संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.पी.बी.चौधरी, श्रीमती जे.बी.ताडगे तसेच न्यायालयीन कर्मचारी व विधीतज्ञ यांचे मोलागचे सहकार्य लाभले. लोकन्यायालयात विविध प्रकरणे सामजस्याने निकाली काढण्यात आले.

Related Stories

No stories found.