दोजापाणी येथील १८ वर्षीय युवकाचा गळा दाबुन खून

अज्ञातविरुध्द गुन्हा दाखल
दोजापाणी येथील १८ वर्षीय युवकाचा गळा दाबुन खून

नंदूरबार - प्रतिनिधी nandurbar

तळोदा (taloda) तालुक्यातील चौगाव, रापापूर शिवारात अज्ञात व्यक्तीने गळा दाबुन दोजापाणी येथील १८ वर्षीय युवकाचा खून केल्याची घटना घडली.

दोजापाणी येथील १८ वर्षीय युवकाचा गळा दाबुन खून
हळदीच्या कार्यक्रमात जमावाच्या मारहाणीत २५ वर्षीय युवकाचा मृत्य

युवकाचा खून झाल्याचे शवविच्छेदनाच्या अहवालातुन उघडकीस आले आहे. याप्रकरणी अनोळखी विरुध्द तळोदा (police) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोदा तालुक्यातील रेवानगर गावाच्या पुढे चौगांव शिवार व रापापूर रस्त्याच्या बाजुला शेतामध्ये विपुल टेट्या पावरा (वय१८) रा.दोजापाणी, ता.तळोदा या युवकाचा दि . २२ व २३ डिसेंबर दरम्यान मृतदेह आढळुन आला होता.

तळोदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद होवुन मयत युवकावर शवविच्छेदन तळोदा उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आला . या शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात गळा दाबल्याने युवकाचा मृत्यू झाल्याचे समोर आल्याने विपुल टेट्या पावरा या युवकाचा अनोळखी व्यक्तीने अनोळखी कारणासाठी गळा दाबुन खून केला आहे. याबाबत टेट्या वनकर पावरा रा.रा.दोजापाणी, ता.तळोदा यांच्या फिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुध्द भादंवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com